स्वराजांना का आठवल्या होत्या शरद पवारांवरुन ललिता पवार? वाचा पवारांबद्दल देशभरातील दिग्गज काय म्हणतात…
देशासह परराष्ट्र धोरणांचा असलेला गाढा अभ्यास असलेले नेते, कुशल संघटक, धोरणी राजकारणी आणि तरुणांना लाजवेल असा सळसळता उत्साह असलेले नेते आणि अजातशत्रू असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. (political leaders reaction on sharad pawar's political scenario)
मुंबई: देशासह परराष्ट्र धोरणांचा असलेला गाढा अभ्यास असलेले नेते, कुशल संघटक, धोरणी राजकारणी आणि तरुणांना लाजवेल असा सळसळता उत्साह असलेले नेते आणि अजातशत्रू असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पवारांच्या राजकीय कार्यकर्तृत्वावर अनेक दिग्गज नेत्यांनी तोंडभरून भाष्य केलं आहे. त्याचा घेतलेला हा आढावा… (political leaders reaction on sharad pawar’s political scenario)
नरसिंह राव यांचे सरकार असताना हे सरकार पडणार की राहणार अशी चर्चा होती. त्यावेळी हे सरकार राहणार असं भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज यांना वाटत होतं. त्याला कारणही तसंच होतं. कारण नरसिंह राव यांच्या पाठी शरद पवार खंबीरपणे उभे होते. विरोधकांचे सर्व डावपेच पवार हाणून पाडण्यात तरबेज असल्यानेच सुषमा स्वराज यांनी त्यांना ललिता पवार यांची उपमा दिली होती. रामविलास पासवान आणि आता शरद यादव म्हणाले नरसिंह राव यांचे सरकार पडणार नाही. अरे भाई, नरसिंह राव तर मौन बाळगून आहेत. भूमिका तर पवार वठवत आहेत. आणि शरद पवार हे शरद पवारांची भूमिका वठवत नसून ललिता पवारांची भूमिका वठवत आहेत, अशी टीका स्वराज यांनी करताच संसदेत एकच हशा पिकला.
तेव्हा पवारच आमच्या बाजूने बोलले
पोटा कायद्यावर चर्चा सुरू होते. त्या बैठकीला सर्व पक्षीय नेते होते. सर्व मित्रच होते. पण सगळे नकारात्मक चर्च करत होते. पोटा चालणार नाही, असं सांगत होते. पण या विधेयकावर शरद पवारांनी अभ्यासपूर्ण सकारात्मक भाषण केलं. त्यांनी अनेक सूचना केल्या आणि आम्हीही त्या सूचना तात्काळ स्वीकारल्या.
– माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी
माझा मुलगा जो काही तो पवारांमुळेच
सेक्युलरतेबाबत मला बोलायचं नाही. माझा मुलगा ओमर अब्दुल्ला आज जो काही आहे तो पवारांमुळे. त्याने स्वत: पवारांच्या घरात राहून ट्रेनिंग घेतलं. त्यांनी मुंबईत पवारांच्या घरात राहून शिक्षण घेतलं. प्रतिभा पवार आणि शरद पवारांच्या सानिध्यात राहून त्यांनी ट्रेनिंग घेतलं. मी पवार कुटुंबीय आणि महाराष्ट्राचा ऋणी आहे.
– फारूख अब्दुल्ला (माजी मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर)
पवारांनीच मला मोठं केलं
कारकिर्दीत माझी योग्यता नव्हती. पण पवार सर्वांना माझ्याबद्दल सांगायचे. चंद्रशेखर असो की आर के सिन्हा सर्वांना ते माझ्याबाबत सांगायचे. मी कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतलं तेही सांगायचे. एखाद्याला पुढे न्यायचे म्हटलं तर ते कशाही प्रकारे त्याला मोठं करत.
– सुशीलकुमार शिंदे (माजी मुख्यमंत्री)
वो जो मराठा नेता है
वो मराठा जो नेता है, पुणा मे रहता है, शिवाजी की प्रेरणा लेता है, यहाँ आता है, तो पता नही कहाँ कहाँ से प्रेरणा लेता है!
– चंद्रशेखर (माजी पंतप्रधान)
पवारांनी इंदिरा गांधींनाही ताकद दाखवून दिली
काँग्रेस पक्षात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रचंड ताकद होती. त्यांचं नेतृत्व अफाट होतं. त्या कुणालाही निवडून आणू शकत होत्या. एवढी ताकद असतानाही पवारांनी महाराष्ट्र हलवून दाखवला. हे पवारांच्या ताकदीचं श्रेय होतं.
– नितीन गडकरी (केंद्रीय परिवहन मंत्री)
पाडायचं की निवडून आणायचं?
पवार इतके राजकीय कौशल्याने चतूर आहेत की केव्हा कुणाशी युती होईल आणि तुटेल काही सांगता येत नाही. राष्ट्रवादीचा नेता एकदा मला म्हणाला, साहेब म्हणाले कामाला लागा. मी म्हटलं म्हणजे काय? तो म्हणाला, मला समजत नाही याला निवडून आणायचं की पाडायचं? – नितीन गडकरी ( केंद्रीय परिवहन मंत्री)
सर्वांचा नाद करा, पण…
तुम्ही सर्वांचा नाद करा, पण पवारांचा नाद करू नका.
– धनंजय मुंडे ( सामाजिक न्याय मंत्री)
नादच खुळा
कुणाची कशी जिरवायची हे आज पवारां इतकं कुणाला जमलं नाही. जमणार नाही. नादच खुळा. नादच खुळा. तरुण पोरांनी पवारांकडून एकच गोष्ट घ्यावी. ती म्हणजे ऐंशीव्या वर्षातील त्यांचा उत्साह. ऐंशीव्या वर्षी लोकांची अक्कल बंद होते. पण पवार अजूनही सक्रिय आहेत. आजही प्रचंड प्रवास करतात आणि आमचे तरुण दोन दिवस प्रवास करून आळंदीला आले तरी थकून जातात. पक्ष कोणता आहे हे महत्त्वाचं नाही. व्यक्ती आणि त्याचं व्यक्तीमत्त्व महत्त्वाचं आहे.
– इंदोरीकर महाराज (किर्तनकार)
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू
महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू कालही शरद पवार होते. आजही पवार आहे आणि उद्याही पवारच असतील. तुम्ही त्यांचा द्वेष करू शकता, पण त्यांना टाळू शकत नाही, हे आज पुन्हा सिद्ध झालंय.
– जितेंद्र आव्हाड (गृहनिर्माण मंत्री) (political leaders reaction on sharad pawar’s political scenario)
… आणि आमदारकी वाचली
एके दिवशी विधानसभेत मनोहर जोशींना घाम फुटेल असं मी भाषण केलं. यावेळी मी जोशी सरकारवर बेधडक शंभर कोटींच्या भ्रष्टाचाराच आरोप केला. माझं भाषण पवार साहेब स्पीकरवर ऐकत होते. त्यांनी चिठ्ठी पाठवून मला बोलावून घेतलं. सहारा प्रकरणात 100 कोटींच्या घोटाळ्याचा तुम्ही आरोप केला. त्याचा पुरावा काय? असा सवाल पवारांनी मला केला. त्यावर विधानसभेतील भाषणावर मानहानीचा खटला दाखल होऊ शकत नाही, असं मी साहेबांना सांगितलं. त्यावर त्यांनी ते ठिक आहे. पण प्रिव्हिलेज होऊ शकतो. तुमची आमदारकी जाऊ शकते, असं मला सांगितलं. त्यावर मी म्हणालो, साहेब माझं चुकलंच. त्यावर ते म्हणाले, असं करा तुमच्या भाषणाच्या शेवटी अशी बाहेर चर्चा आहे, असं म्हणा. हे वाक्य भाषणाच्या शेवटी घाला. त्यानंतर मी तसंच केलं. नंतर मला कळलं की मनोहर जोशी माझ्याविरोधात प्रिव्हिलेज मोशन आणणार होते. पण शेवटचं वाक्य वाचून विधानसभा सचिवांनी प्रिव्हिलेज मोशन होऊ शकत नसल्याचं सांगितलं आणि आमदारकी वाचली. एखाद्या कार्यकर्ता अडचणीत सापडला म्हणजे त्याला अडचणीतून बाहेर काढणारे एकमेव व्यक्ती म्हणजे पवार साहेब.
ज्याला आयुष्यात रोजगार हमी योजनेवर काम करावं लागलं. अशा रोजगार हमीच्या मजुराला उपमुख्यमंत्रिपदावर दानत केवळ पवारांमध्येच आहे. इतर कोणीही हे करू शकत नाही.
– दिवंगत आर. आर. पाटील (उपमुख्यमंत्री)
पहिल्यांदाच पवारांना हळवं झालेलं पाहिलं
माझा प्रहार सिनेमा दिल्लीत दाखवणार होते. मी पवारांना म्हणालो, माझी आई सोबत आली तर चालेल का? त्यावर ते हो म्हणाले. त्यानंतर मी आईला त्यांच्या विमानातून दिल्लीला घेऊन गेलो. माझी आई 96 वर्षाची होती. कार्यक्रम झाल्यावर मी तिची पवारांशी ओळख करून दिली. त्यावेळी तिने पवारांच्या पाठीवर हात ठेवून कसा आहेस बाबा? अशी विचारपूस केली. त्यावर पवार हळवे झाले होते. मी पहिल्यांदाच पवारांना हळवं झालेलं पाहिलं.
– नाना पाटेकर (अभिनेता)
पवार मुख्यमंत्री झाले आणि…
1990मध्ये मी आमदार झालो. त्यावेळी पवारसाहेबांनी मला फोन करून सांगितलं की, पद्मसिंह पाटील यांना मुख्यमंत्री करणं गरजेचं आहे. ते चांगलं काम करतील. मी सीताराम केसरींना सांगितलं आहे. पण मी त्यांना माझा निर्णय झाल्याचं सांगितलं. मी एक बाजू धरलीय. आता ती सोडणं बरोबर नाही, असंही त्यांना म्हणालो. तेव्हा ते नाराज झाले. त्यांनी फोन कट केला. पण काही दिवसानंतर तेच मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही मंत्रालयाकडे जाणंच सोडलं होतं. चार-सहा महिने तिकडे फिरकलोच नाही.
– जयंत पाटील (राष्ट्रवादी, प्रदेशाध्यक्ष) (political leaders reaction on sharad pawar’s political scenario)
प्रत्येक गोष्टीत परफेक्ट
पवार साहेब स्वत:च्या आरोग्याची चांगली काळजी घेतात. दौऱ्यावर जात असताना ज्या शहरात ज्याचे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना जेवण, खाणं आणि झोपण्याची व्यवस्था करायला सांगतात. एखाद्या कार्यकर्त्याला साहेबांनी नावानी हाक मारली तर तोही बुचकळ्यात पडतो. साहेबांना माझं नाव कसं माहीत, असं त्याला वाटतं.
– बोराटे (पवारांचे ड्रायव्हर)
तोपर्यंत मला उठवलं नाही
एकदा आम्ही निवडणूक प्रचाराच्या दौऱ्यावर होतो. तेव्हा एका सर्किट हाऊसला उतरलो होतो. तेव्हा साहेबांनी सर्किट हाऊसच्या मॅनेजरला सांगितलं धुवाळी दिवसभर झोपतील. जोपर्यंत ते स्वत:हून उठत नाही तोपर्यंत त्यांना उठवू नका, असं सांगून ते प्रचाराला गेले. मी रात्री आठ वाजता उठलो. पण मला तोपर्यंत उठवलं गेलं नाही.
– पी. एन. धुवाळी (पवारांचे स्वीय सहाय्यक) (political leaders reaction on sharad pawar’s political scenario)
… आणि इंदिरा संत यांना पुरस्कार मिळाला
पवारांनी एक योजना तयार केली होती. त्यानुसार पुरस्कार घोषित झाले. पण सरकारी बाबूंनी पुरस्काराच्या यादीतून इंदिरा संत यांचं नाव वगळलं. कारण नियमाच्या अटीनुसार फक्त महाराष्ट्रातील साहित्यिकांनाच पुरस्कार द्यायचा होता. मी पवारांना भेटलो आणि बेळगाव महाराष्ट्रात घ्यायची भूमिका आपण सोडलीय का? असं त्यांना विचारलं. त्यावर काय झालं? म्हणून त्यांनी विचारलं. तेव्हा इंदिरा संत बेळगावच्या असल्याने त्यांना पुरस्कार नाकारल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर आठ दिवसात चक्र फिरली आणि इंदिरा संत यांना घरी जाऊन पुरस्कार देण्यात आला.
– मधु मंगेश कर्णिक (साहित्यिक)
मी काय ऐंशी वर्षांचा आहे का?
मागच्या विधानसभा निवडणुकीतील हा किस्सा. पवारांनी साताऱ्यात सभा घेतली. पावसात भिजत होते. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर अनेक टीका केल्या. पवारांचं राजकारण संपल्याच्याही वल्गना झाल्या. तेव्हा भर पावसात भिजत पवार म्हणाले, मी काय ऐंशी वर्षाचा आहे? काही सांगयताय. लई पाहिलेत, अजून लई पाठवायचे आहेत घरी. (हशा)
संबंधित बातम्या:
Sharad Pawar Birthday | विरार का छोरा, करणार परळीचा दौरा!
UPA अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची सगळीकडे चर्चा, पण खुद्द पवार काय म्हणतायत?
‘वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश आहे’
(political leaders reaction on sharad pawar’s political scenario)