रेखा जरे हत्याकांड: फरार बोठेची माहिती द्या; पोलिसांचं नागरिकांना आवाहन

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी, पत्रकार बाळ बोठे हा अद्यापही फरार आहे. (Rekha Jare Murder Case: Police Appeal To Citizens for give information About Accused)

रेखा जरे हत्याकांड: फरार बोठेची माहिती द्या; पोलिसांचं नागरिकांना आवाहन
Rekha Jare Murder Case
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 11:41 AM

नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी, पत्रकार बाळ बोठे हा अद्यापही फरार आहे. बोठेच्या शोधासाठी पोलिसांची पथके कामाला लागलेली आहेत. मात्र आठवडा उलटून गेला तरी त्याचा शोध लागत नसल्याने अखेर पोलिसांनी नागरिकांनाच त्याच्याबद्दलची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. ही माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. (Rekha Jare Murder Case: Police Appeal To Citizens for give information About Accused)

30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेचा संशय पत्रकार बाळ बोठेकडे गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, 30 नोव्हेंबरपासून तो फरार असल्याने पोलिसांनी त्याची माहिती देण्यासाठी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केलं आहे. बोठेबाबत काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्या. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

गळा चिरून हत्या

नगर-पुणे महामार्गावरील सुप्याजवळ असलेल्या जातेगाव घाट परिसरात ३० नोव्हेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून, पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे हा मात्र फरार आहे.

कार्यालयाची झाडाझडती

बोठे याचा पोलिसांमार्फत कसून शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी राज्यासह, परराज्यातही पथके पाठविण्यात आली आहेत. मात्र बोठे याचा ठावठिकाणा अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. काही माहिती मिळविण्यासाठीच आरोपी बोठे याच्या घराची व कार्यालयाची पुन्हा एकदा झाडाझडती घेण्यात आली, असं जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बोठे याच्या घरी व ऑफिसमध्ये पुन्हा एकदा झाडाझडती घेण्यात आली आहे. याठिकाणी काही ठोस पुरावे आम्हाला मिळाले आहेत. बोठेबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे. आम्ही विश्वास बाळगतो की लवकरात लवकर त्याला अटक करू. मात्र नागरिकांना देखील आमचे आवाहन आहे की, याबाबत कुठलीही माहिती कोणाकडे असेल, तर निश्चित पोलिसांना द्यावी. या संदर्भात पूर्णपणे गोपनीयता बाळगली जाईल, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. (Rekha Jare Murder Case: Police Appeal To Citizens for give information About Accused)

संबंधित बातम्या:

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.