शिंपी संघटनेने करुन दाखवलं, एका झपाट्यात 3 हजार मास्क शिवले

कोरोनाविरोधात लढण्यासाठी (Shimipi organization distribute mask) आतापर्यंत अनेक दिग्गजांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. या लढाईत शिंपी संघटनेकडूनही एक मौल्यवान मदत करण्यात आली आहे.

शिंपी संघटनेने करुन दाखवलं, एका झपाट्यात 3 हजार मास्क शिवले
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 6:25 PM

गोंदिया : कोरोनाविरोधात लढण्यासाठी (Shimipi organization distribute mask) आतापर्यंत अनेक दिग्गजांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. या लढाईत शिंपी संघटनेकडूनही एक मौल्यवान मदत करण्यात आली आहे. कोरोनाविरोधाच्या लढाईत लढण्यासाठी मास्कदेखील महत्त्वाचे आहेत. कारण मास्कमुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही. मात्र, राज्यात मास्कचा तुटवडा आणि काळाबाजार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे शिंपी संघटनेने 3 हजार मास्क शिवून गावात मोफत वाटण्याचा निर्धार केला (Shimipi organization distribute mask).

कोरोनाविरोधाच्या लढाईत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या महागावातील शिंपी संघटनेकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. शिंपी संघटनेने 3 हजार मास्क शिवून गावात मोफत वाटून सामाजिक बांधिलकी जपली आहे. महागावचे सरपंच प्रमोद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हे समाजकार्य पार पडलं.

गावातील 15 टेलर्सनी एकत्र येऊन मास्क शिवण्याचं काम हाती घेतलं. गावच्या जिल्हा परिषद शाळेत मास्कच शिवणकाम करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण गावात मास्कची वाटप करण्यात आली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी मास्क वापरुन स्वत:चं रक्षण करावं, असा संदेश संघटनेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाविरोधात लढण्यासाठी अनेक उद्योगपती आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या टाटा कंपनी आणि सामाजिक संस्थेकडून एकूण 1500 कोटींची मदत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ‘पार्ले जी’ या बिस्किट कंपनीने तीन आठवड्यात तीन कोटी बिस्किट पुडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणाकडून किती मदत?

  • शिर्डी साईबाबा ट्रस्ट – 51 कोटी
  • CRPF अधिकारी – 33.81 कोटी
  • मुकेश अंबानी – 5 कोटी
  • अभिनेता प्रभास – 4 कोटी
  • बॉक्स ऑफिस इंडिया – 3 कोटी
  • अल्लू अर्जुन – 1.25 कोटी
  • अभिनेता पवनकल्याण – 1 कोटी
  • सचिन तेंडुलकर – 50 लाख
  • शिवसेना खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • राष्ट्रवादी खासदार – आमदार – एक महिन्याचा पगार
  • नितीन गडकरी – एक महिन्याचा पगार
  • आनंद महिंद्रा – एक महिन्याचा पगार
  • भाजप खासदार – एक महिन्याचा पगार
  • भाजप आमदार – एक महिन्याचा पगार

संबंधित बातम्या :  इस्लामपुरातील ‘कोरोना’बाधितांवर गुन्हा दाखल करा, संभाजी भिडेंची मागणी

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.