‘रक्तदान करा, एक किलो चिकन, पापलेट किंवा पनीर मोफत घेऊन जा’; रक्तदान वाढवण्यासाठी शिवसेनेचा फंडा!

राज्यात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. (ShivSena Offers 1 Kg Chicken Or Paneer For blood donor)

'रक्तदान करा, एक किलो चिकन, पापलेट किंवा पनीर मोफत घेऊन जा'; रक्तदान वाढवण्यासाठी शिवसेनेचा फंडा!
Follow us
| Updated on: Dec 13, 2020 | 1:14 PM

मुंबई: राज्यात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेनंतर रक्तदात्यांना रक्तदान शिबिरात खेचून आणण्यासाठी अभिनव शक्कल लढवली आहे. रक्तदान करा आणि एक किलो चिकन किंवा एक किलो पापलटे किंवा पनीर घेऊन जा, अशी ऑफरच शिवसेनेने दिल्याने त्याची जोरदार चर्चा होत आहे. (ShivSena Offers 1 Kg Chicken Or Paneer For blood donor)

कोरोना संकटामुळे मुंबईसह राज्यातील रक्तसाठा कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. दोन दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य राजेश टोपे यांनीही राज्यात सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचं सांगून रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त राज्यात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वत: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून रक्तदात्यांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं.

दादर, प्रभादेवीत रक्तदान

त्यानुसार आज शिवसेनेने माहिम, दादर, वरळी आणि प्रभादेवी परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. मात्र, या शिबिरातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना एक किलो चिकन आणि एक किलो मटर पनीर देण्याची ऑफर देण्यात आली आहे. तसे पोस्टर आणि बॅनर्सही या परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे या ऑफरची परिसरात चर्चा रंगली. दरम्यान, अनेक रक्तदात्यांनी या ऑफरचा लाभ न घेता स्वखुशीने रक्तदान केल्याचं आमदार सदा सरवणकर आणि नगरसेवक समाधान सरवणकर यांनी सांगितलं. या दोघांच्या प्रयत्नातून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.

चक्क 58 वेळा रक्तदान

चेंबूर लालडोंगर परिसरात शिवसेनेचे जुनेजाणते शिवसैनिक प्रकाश देसाई यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांनीही या रक्तदान शिबिरात भाग घेतला. या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवसैनिकांनीही मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं. यावेळी काही लोकांनी तर चक्क 58 वेळा रक्तदान केल्याचंही आढळून आलं आहे. रक्तदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं प्रकाश फातर्पेकर यांनी सांगितलं.

रक्तदात्यांना एक किलो पापलेट

मुंबईतील ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा असल्याने मुलुंडमध्येही शिवसेनेच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी इथेही रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 किलो पापलेट मासे, 1 किलो चिकन आणि शाकाहारी रक्तदात्यांना 1 किलो पनीर भेट देण्यात येत आहे. (ShivSena Offers 1 Kg Chicken Or Paneer For blood donor)

संबंधित बातम्या:

गोपीनाथ गडावर पंकजा, प्रीतम मुंडे, भजन ते रक्तदान, काय काय घडलं?

राज्यात आठवडाभर पुरेसाच रक्तसाठा, मंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रक्तदानाचे आवाहन

दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती

(ShivSena Offers 1 Kg Chicken Or Paneer For blood donor)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.