‘8 डिसेंबरचा भारत बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस असेल’

'कृषी कायदा रद्द होणार की नाही? होय की नाही तेवढंचं सांगा!' सरकार यावर मौन पाळून आहे पण शेतकऱ्यांचे यामध्ये हाल होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

'8 डिसेंबरचा भारत बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस असेल'
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 7:38 AM

मुंबई : ‘शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्याच हक्काने ते दिल्लीत (Delhi) ठामपणे आंदोलन करत आहेत. त्यांना जे कृषी कायदे (Agricultural laws) जुलमी वाटत आहेत, ते मागे घेण्यात सरकारलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. किंबहुना, तो मनाचा मोठेपणाच ठरेल. शेतकऱ्यांशी चर्चा करणाऱ्या सांगकाम्यांना याचं भान नाही’ अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून (saamana) भाजप (Bjp) सरकारवर टीका करण्यात आली आहे. इतकंच नाही तर 8 डिसेंबरचा भारत बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस अशीही टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. (shivsena saamana artical on bharat bandh on 8 december criticized on bjp government)

खरंतर, केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा रद्द व्हावा यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. बैठका झाल्या तरीही सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाचा स्फोट होईल, ही तर सरकारच्या कर्माची फळ असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.

प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य सरकारने दाखवलं असतं तर आजची कोंडी थोडी सैल झाली असती. आज परिस्तिथी बिघडत चालली आहे. ही सरकारच्याच कर्माची फळे आहेत अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे. इतकंच नाही तर यावेळी ‘कृषी कायदा रद्द होणार की नाही? होय की नाही तेवढंचं सांगा!’ सरकार यावर मौन पाळून आहे पण शेतकऱ्यांचे यामध्ये हाल होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

यावेळी अग्रलेखातून भाजपच्या अनेक नेत्यांवर आणि कार्यपद्धतीवर घणाघाती टीका करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांनी हिंदुस्तान बंदची हाक दिली आहे. हा बंद कडकडीत व्हावा अशी तयारी सुरू आहे. त्यामुळे 8 डिसेंबरचा हा बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस असेल अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणार आहेत. त्यावेळी जुन्या संसद भवनावर धडप घालू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार अश्रुधूर आणि बंदुका चावणार का? असा थेट सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे. (shivsena saamana artical on bharat bandh on 8 december criticized on bjp government)

इतर बातम्या –

शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध, 26 नोव्हेंबरला शेकापकडून भारत बंदची हाक

दिल्ली शेतकरी आंदोलन : महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या भूमिका काय?

(shivsena saamana artical on bharat bandh on 8 december criticized on bjp government)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.