सुनेला प्रसव वेदना, रात्रीच्या अंधारात सासू-सुनेची पायपीट, वर्दीतल्या साहेबांची माणुसकी

सोलापुरात रात्री बारा वाजेच्या सुमारास प्रसव वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला पोलिसांनी मदत करत सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं (Solapur Police Humanity).

सुनेला प्रसव वेदना, रात्रीच्या अंधारात सासू-सुनेची पायपीट, वर्दीतल्या साहेबांची माणुसकी
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 2:15 PM

सोलापूर : राज्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे (Solapur Police Humanity). सोलापुरातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सोलापुरात विशेष संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलं आहे. मात्र, अशा परिस्थितही पोलिसांकडून माणुसकी जपली जात आहे. सोलापुरात रात्री बारा वाजेच्या सुमारास प्रसव वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला पोलिसांनी मदत करत सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं (Solapur Police Humanity).

सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आनंदा पाटील आणि त्यांचे सहकारी गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना दोन महिला आणि एक पुरुष रस्त्यावर चालताना दिसले. त्यांची विचारपूस केल्यावर पोलिसांना त्यांची अगतिकता आणि हतबलता लक्षात आली.

“आमच्या सुनेच्या पोटात खूप दुखत आहे. साहेब रिक्षा नाही. पोलीस गाडी पकडतात म्हणून कोणी गाडीही देत नाही. आम्ही इथे दवाखान्यासाठी आलो आहोत. मात्र दवाखानासुद्धा बंद आहे. त्यामुळे आता आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालत जाण्याशिवाय पर्याय नाही”, असं हतबल झालेल्या सासूने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना सांगितलं.

विजयानंद पाटील यांनी महिलेचं बोलणं ऐकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता आपल्या सरकारी वाहनातून प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या रवीना विजय काळे, तिची सासू सिंधू काळे, पती विजय काळे या तिघांना सुखरुपपणे सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं. विजयानंद पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे सिंधू काळे ही महिला भावूक झाली आणि तिने त्यांचे हात जोडून आभार मानले. दरम्यान, या मदतीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील आणि त्यांच्या टीमवर सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या :

जे जोडे घालून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, ते जोडे विकून कोरोना लढ्यासाठी 3 लाख, गोल्फर अर्जुन भाटीचं कौतुक

औरंगाबादमध्ये ‘कोरोना’बाधित महिलेच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी!

नवी मुंबईत एकाच IT कंपनीतील 40 पैकी 19 कर्मचाऱ्यांना कोरोना, अन्य कर्मचाऱ्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा

अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.