AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचं 1 ऑगस्टचं आंदोलन आजच कसं? त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा : पशु व दुग्ध विकास मंत्री

राज्यभरात दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि भाजप रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनावर भाष्य करताना राज्याचे पशू आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी भाजपवर निशाणा साधला (Sunil Kedar slams BJP on Strike Protest of Milk producer Farmer).

भाजपचं 1 ऑगस्टचं आंदोलन आजच कसं? त्यांच्या आंदोलनाला शुभेच्छा : पशु व दुग्ध विकास मंत्री
| Updated on: Jul 20, 2020 | 5:07 PM
Share

नागपूर : राज्यभरात दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि भाजप रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनावर राज्याचे पशू आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना प्रतिक्रिया दिली (Sunil Kedar slams BJP on Strike Protest of Milk producer Farmer). “दुधाच्या दरवाढीबाबत मुंबईत उद्या (21 जुलै) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पूर्वनियोजित आहे. मात्र, या बैठकीच्या पार्श्वभूमीवरच भाजपने 1 ऑगस्ट रोजी ठरवलेलं आंदोलन आज (20 जुलै) केलं. तरीही या आंदोलनाला माझ्या शुभेच्छा आहेत”, अशी उपरोधिक टीका सुनील केदार यांनी केली (Sunil Kedar slams BJP on Strike Protest of Milk producer Farmer).

हेही वाचा :

“महाराष्ट्रात दुधाची मागणी कमी पडू नये आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहावी यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार राज्य सरकार शेतकऱ्यांकडून जादा दराने दूध विकत घेऊन त्यापासून भुकटी तयार करणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी 50 टक्के खर्च करावे, असं प्रस्तावात म्हटलं होतं. मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारची ही विनंती मान्य केली नाही”, असं सुनील केदार यांनी सांगितलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“केंद्राकडून प्रस्ताव मान्य न झाल्याने अखेर राज्य सरकारने या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे. याबाबत काम सुरु करण्यात आलं आहे”, असं सुनील केदार म्हणाले.

“दुधाला योग्य भाव मिळावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. याबाबत उद्याचा बैठकीत चर्चा केली जाणार आहे. सर्वांची मतं घेऊन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेईन. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ”, असं पशु आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, या आंदोलनात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यासाठी शेतकरी थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्यावतीने आज संगमनेर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव दर देण्याची मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

  • दुधाला प्रतिलीटर 30 रुपये दर द्या
  • केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा
  • दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं केंद्रातलं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : विजय वड्डेट्टीवार

जनतेने आमदारांना, तर आमदारांनी मला निवडून दिलंय, जयंत पाटलांनी धारिष्ट्य दाखवावं : गोपीचंद पडळकर

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.