Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jhund Song Teaser : पंगा लेने वाले रोते रह जाएंगे, जब ये झुंड आएगा, म्हणत अमिताभनं शेअर केला गाण्याचा टिझर

अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या झुंड चित्रपटाची प्रेषक आतुरतेने वाट पाहत आहे. अभिताभ बच्चनच्या रसिकाना या चित्रपटाची उत्सुकता असल्याने चित्रपटाच्या प्रत्येक घडामोडीकडे रसिकांचे लक्ष आहे.

Jhund Song Teaser : पंगा लेने वाले रोते रह जाएंगे, जब ये झुंड आएगा, म्हणत अमिताभनं शेअर केला गाण्याचा टिझर
बॉक्स ऑफिसरवर जादू चालवण्यात पहिल्या दिवशी झूंड कमी पडलाय.Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 6:27 PM

मुंबईः नागराज मंजूळे यांच्या बहुचर्चित झुंड  या चित्रपटातील पहिल्या गाण्याच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटातील आया ये झुंड है उद्या 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हेलिनटाईन डे दिवशी रिलीज होत आहे. अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांच्या झुंड (Jhund) चित्रपटाची प्रेषक आतुरतेने वाट पाहत आहे. अभिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) रसिकाना या चित्रपटाची उत्सुकता असल्याने चित्रपटाच्या प्रत्येक घडामोडीकडे रसिकांचे लक्ष आहे. अमिताभच्या फॅन्सना हा चित्रपट थिएटर की दुसऱ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर येतो याचीही उत्सुकता होती.

झुंड चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपट चित्रपटगृहावर प्रदर्शित केला जाईल असे जेव्हा जाहीर केले तेव्हा अमिताभ आणि नागराजच्या फॅन्सना याचा पारावर राहिला नाही. त्यानंतर आता लगेच झुंडच्या पहिल्या गाणं रिलीज झाल्याची घोषणा करुन ‘आया ये झुंड है’ (Aaya Ye Jhund Hai) हे गाणं उद्या व्हॅलेंटाईन डे दिवशी प्रदर्शित होत आहे असं जाहीर करण्यात आले. या गाण्याचं पोस्टरही नुकतच जाहीर करण्यात आले होते, त्यानंतर त्या गाण्याचा छोटासा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांची सगळी फलटण दिसत आहे, आणि त्या सगळ्या गँगच्या हातात बॅट आणि बॉल आहेत.

प्रेषकांना आणखी उत्सुकता

अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून 20 सेकंदाचा टिझर रिलीज केला आहे. टिझर शेअर करताना बच्चन यांनी लिहिले आहे की, पंगा लेने वाले रोते रह जाएंगे जब ये झुंड आएगा और सबका दिल जीत कर जाएगा. त्यामुळे प्रेषकांना आणखी उत्सुकता लागली आहे. आया ये झुंड है हे गाणं उद्या रिलीज होत आहे तर 4 मार्च रोजी चित्रपट प्रेषकांच्या भेटीला येत आहे. अमिताभ या गाण्याच्या टीझरमध्ये कुठेच दिसत नाहीत पण त्यांच्या सोबत असलेले सगळे कलाकार यामध्ये दिसत आहेत. टिझर बघून तर हे गाणं यंगस्टार्समध्ये चांगलाच गाजणार आहे, आणि सगळ्यांना आवडणारही आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील सध्याच आघाडीचा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे करत आहे. तर संगीत अजय-अतुलच आहे. अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाबरोबच ते आणखी काही चित्रपटातून काम करत आहेत. ते रणवीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्रमधूनही रसिकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आयान मुखर्जी करत असून एप्रिलमध्ये येणाऱ्या रनवे 34 मध्येही ते दिसणार आहेत, आणि या चित्रपटात अजय देवगणही आहे. संंबंधित बातम्या

राजश्री खरात होय तिच, फँड्रीतील साधी भोळी शालू, आता नव्या लूकमध्ये बघाल तर विश्वास बसणार नाही…

राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी होते, रेस्टॉरंट, पब्ज सुरू आहेत, मग चित्रपटगृह का सुरू होत नाही?; मनसेचा सवाल

Reaction : कंगनाच्या निशाण्यावर आता दीपिका पादुकोण, म्हणाली कचरा विकू नकोस…, वाचा नेमका वाद काय?

संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल.
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...
कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण....