लॉकडाऊनमुळे तंबाखू पुरवून पुरवून खाण्याची वेळ, मित्राने पुडी न दिल्याने मारहाण
तंबाखूची पुडी न दिल्याने मित्रानेच मित्राला मारहाण केल्याची धक्कादायक घटना (Fights between friends on Tobacco) नाशिकच्या देवळाली येथे घडली आहे.
नाशिक : तंबाखूची पुडी न दिल्याने मित्रानेच मित्राला मारहाण केल्याची धक्कादायक घटना (Fights between friends on Tobacco) नाशिकच्या देवळाली येथे घडली. या मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संबंधित मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Fights between friends on Tobacco).
लॉकडाऊनदरम्यान गुटखा, तंबाखूचं व्यसन असणाऱ्या तरुणांची मोठी अडचण झाली आहे. या तरुणांना आता सहजासहज गुटखा किंवा तंबाखूची पुडी मिळणं कठीण होऊन बसलं आहे. लॉकडाऊनदरम्यान जीवनाश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद आहेत. जी दुकानं खुली आहेत त्यात तंबाखू मिळणं कठीण आहे.
तंबाखूच्या एका पुडीची किंमत 50 ते 60 रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, तरीदेखील काही लोकांचं तंबाखू व्यसन अजूनही सूटलेलं नाही. याच व्यसनातून दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी झाली. तंबाखूच्या एका पुडीसाठी मित्रानेच मित्राला इतर मित्रांना घेऊन मारहाण केली. एका तंबाखूच्या पुडीवरुन मित्रांमध्ये वाद झाल्यामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.
याअगोदर सोशल मीडियावर तंबाखूच्या पुडीशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक तरुण लॉकडाऊनदरम्यान तंबाखू खरेदीसाठी घराबाहेर पडला होता. त्याचवेळी तो तरुण पोलिसांच्या ताब्यात सापडतो. लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर का पडला? असं विचारल्यावर तरुण तंबाखूच्या पुडीचं कारण देतो. त्यामुळे पोलीस त्याला चांगलाच चोप देतात, असं त्या व्हिडीओत होतं.
हेही वाचा :
Nirmala Sitharaman | फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजारापर्यंत कर्ज, सीतारमण यांची मोठी घोषणा