AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोंड्याची समस्या मुळापासून दूर करायचीय? पाच पद्धतीनं करा ऑलिव्ह ऑइलचा वापर

कोंड्याच्या समस्येसाठी ऑलिव्ह ऑइल वापरण्याचा सल्ला अनेकांकडून देण्यात येत असतो. परंतु त्याचा वापर नेमक्या कुठल्या पध्दतीने करावा याबाबत फारशी माहिती नाही. केसांसाठी ऑलिव्ह ऑइल हे अत्यंत गुणकारी सिध्द झाले आहे. पुढील पाच पध्दतींचा वापर करुन तुम्ही कोंड्यांच्या समस्येपासून कायमची सुटका करु शकतात.

कोंड्याची समस्या मुळापासून दूर करायचीय? पाच पद्धतीनं करा ऑलिव्ह ऑइलचा वापर
तेलाच्या या प्रकारांबाबत आणि त्यांच्या उपयोगांबाबत तुम्हाला माहीत आहे?
| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 11:58 AM
Share

अनेक जण केसात कोंडा (dandruff) होण्याच्या समस्येने चिंताग्रस्त असतात. चुकीची जीवनपध्दती, केसांची निगा न राखणे, (hair care) तणाव आदी विविध कारणांमुळे केसांमध्ये कोंडा निर्माण होत असतो. याशिवाय कोंड्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होण्याचा धोका असतो. डोक्यावर जास्त कोंडा हा वेळप्रसंगी तीव्र खाज निर्माण करु शकतो. कोंडा तणावाचे कारण देखील बनतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण महागड्या उत्पादनांऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करतात. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या वापरल्यास कोंड्याच्या समस्येपासून आपण दूर होउ शकतो. यामध्ये ऑलिव्ह ऑइलचा (olive oil) प्रामुख्याने समावेश होतो.

ओलावा टिकवण्यासाठी मदत

अनेक वेळा हिवाळ्यात त्वचा कोरडी पडत असते. त्यामुळे खाज आणि वळखण आदी समस्या निर्माण होत असतात. अशा परिस्थितीत, केस व डोक्यावरील ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी ऑलिव्हचा चांगल्या पध्दतीने वापर होउ शकतो. यातून ओलावा टिकण्यास मदत होते. शिवाय कोंड्याची समस्या दूर होते.

ऑलिव्ह ऑईल आणि लिंबू

कोंडा दूर करण्यासाठी लिंबूदेखील प्रभावी माध्यम आहे. लिंबूमध्ये असलेले गुणधर्म बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यास मदत करतात. शिवाय केसांच्या काळजीसाठी लिंबूचा समावेश करणे चांगले मानले जाते. लिंबू ऑलिव्ह ऑइलसोबत लावण्यासाठी एका भांड्यात तेलात लिंबाचा रस मिसळा. ते टाळूवर लावा आणि सुमारे 45 मिनिटे लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ धून घ्यावे. यामुळे केस मजबूत होतात.

ऑलिव्ह ऑइल आणि व्हिनेगर

कोरडेपणा आणि कोंडा दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर एकत्र मिसळून केसांना लावा. व्हिनेगरमध्ये असलेले अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म केसांमधील कोंडा दूर करतात आणि त्यांना निरोगी बनवतात. एका भांड्यात ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यात 3 चमचे व्हिनेगर टाका. हे मिश्रण डोक्यावर पाच मिनिटे लावा आणि नंतर स्वच्छ धुवा. या पद्धतीमुळे केसांमधला कोंडा तर कमी होईलच शिवाय केसगळतीही कमी होईल.

ऑलिव्ह ऑइल आणि अंडी

अंड्यातील प्रोटीनमुळे केस मजबूत होतात. यासाठी अंड्याला फेटून त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल टाका. हा मास्क टाळूवर चांगला लावा आणि त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसगळती तर कमी होतेच, शिवाय केसांना चांगली चमकही निर्माण होते.

इतर बातम्या-

Crop Insurance : वातावरणातील बदलाचा परिणाम थेट रब्बी पीकविमा योजनेवर, गतवर्षीच्या तुलनेत काय झाले बदल? वाचा सविस्तर

अमरावतीत पुतळा उभारणाऱ्यांनी नियम तोडले? पुतळा उभारायचा तर काय आहेत नेमके नियम?

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.