Vinayak Chaturthi 2022 | आज विनायक चतुर्थी , जाणून घ्या वेळ आणि पूजा करण्याची पद्धत
भगवान गणेशाच्या भक्तांसाठी विनायक चतुर्थीचा दिवस खूप महत्वाचा आहे. बरेच लोक या दिवशी पूजा करतात आणि उपवास करतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतात.
मुंबई : हिंदू धर्मात कोणत्याही कार्यक्रमात प्रथम गणेशाची पूजा केली जाते. प्रत्येक पूजा सुरु होण्यापूर्वी विघ्नहर्ताची उपासना करण्याची परंपरा आहे. मान्यता आहे की, विघ्नहर्ताची उपासना केल्याने सर्व दु: ख दूर होतात. एवढेच नाही तर जिथे गणेशाचे वास्तव्य आहे तेथे सुख आणि समृद्धी येते, अशी मान्याता आहे. भगवान गणेशाच्या भक्तांसाठी विनायक चतुर्थीचा दिवस खूप महत्वाचा आहे. बरेच लोक या दिवशी पूजा करतात आणि उपवास करतात. या दिवशी विधीवत पूजा केल्याने तुमचे सर्व दुःख दूर होतात. या वर्षातील पहिली पौष महिन्यातील विनायक चतुर्थी ६ जानेवारीला येत आहे. चला तर मग या चतुर्थीचे महत्त्व जाणून घेऊयात.
वरद चतुर्थी तिथी 2022
पंचांगानुसार, शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 5 जानेवारीला दुपारी 2.34 वाजता सुरू होईल आणि 6 जानेवारीला दुपारी 12.29 वाजता समाप्त होईल. 6 जानेवारी रोजी सकाळी 11.15 ते दुपारी 12.29 या वेळेत गणेशाची पूजा करता येईल.
विनायक चतुर्थी पूजेची पद्धत ? विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.
? या दिवशी पूजास्थळ स्वच्छ करुन गंगाजल शिंपडा. आपण मंदिरात पूजा देखील करु शकता.
? गणपतीची मूर्ती स्थापित करा आणि त्यांच्यासमोर दिवा प्रज्वलित करा .
? त्यानंतर गणपतीला लाल कुंकू, अक्षता, फुले इत्यादी अर्पण करा.
? गणेशाला मोदकाचे नैवेद्य दाखवा.
? यानंतर गणेश पाठाचे पठण करा आणि नंतर आरती करावी.
विनायक चतुर्थीचे महत्व काय?
भगवान गणेशाला शक्ती, सामर्थ्य, बुद्धी आणि भरभराटीचे देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, जर कोणी विनायक चतुर्थीच्या दिवशी विधीवत गणरायाची पूजा करते, तर त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्हाला गणेशाच्या आशीर्वादाने आयुष्यात यश मिळेल.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
Mangal Dosh Nivaran | मंगळ दोष दूर करण्यासाठी हे उपाय करा, सर्वकाही ‘मंगलमय’ होईल
Vastu Tips | घराजवळ ही झाडं असतील तर हातात पैसा टिकणार नाही, आता निर्णय तुमचा