पुण्यासह राज्यात पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. (Weather Forecast Today Live)
Weather Forecast Today Live मुंबई : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्या आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वारंवार हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे (Pune heavy rain). या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगडकरांना सर्व यंत्रणांनी सावध राहण्याचा इशारा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.
आजच करा जनधन खात्याशी Aadhaar लिंक, मिळतील 5000 रुपये
Mah state govt DM Authority has issued a circular for prevention of casualties and losses from lightning?? strikes likely in the state for next 4,5 days associated with heavy to very heavy rainfall alerts given by IMD @RMC_Mumbai pic.twitter.com/X7KnvNwMTs
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 13, 2020
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात किनारपट्टीलगच्या सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार (heavy to very heavy falls) पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागांतही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर वादळात झालं आहे. यामुळे मंगळवारी देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल. यावेळी 55-65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर नंतर याचा वेग 75 किमी तासापर्यंत वाढू शकतो. यावेळी समुद्री भागामध्ये 20 सेंटीमीटर पाऊस होऊ शकतो असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
Covid Vaccine Update: कोरोना लस देताच प्रकृती बिघडली, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीनं ट्रायल थांबवलं
मच्छिमारांना अलर्ट जारी पुढील 24 तासात ते दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिली असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये.