Joe Biden | ‘जो’ जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

Joe Biden | 'जो' जीता वही सिकंदर!; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 10:46 PM

वॉशिंग्टन: जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडन यांनी या अटीतटीच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत बायडन यांना 273 इलेक्ट्रोल मते मिळाली असून ट्रम्प यांना अवघ्या 214 इलेक्ट्रोल मतांवर समाधान मानावं लागलं आहे. (Who is Joe Biden? know about everything)

व्हाइट हाऊसमधील राजकारणाचा तब्बल 46 वर्षे अनुभव असलेले आणि दोनदा अमेरिकेचे उपराष्ट्रपती राहिलेले जो बायडन हे अनेक कारणांनी प्रसिद्धही आहेत आणि वादग्रस्तही ठरलेले आहेत. जो बायडन अर्थात जोसेफ रॉबिनेट बायडेन ज्युनिअर यांचा जन्म 1942मध्ये पेन्सिलवेनियाच्या स्क्रँटन येथे झाला. लहानपणीच त्यांचे कुटुंबीय डेलवेअरला राह्यला आले होते. त्यांना कौटुंबिक जीवनात अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांची पहिली पत्नी निलीया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर वयाच्या 46व्या वर्षी मुलगा ब्यू याचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला होता. मात्र, कौटुंबिक संकट आल्यानंतरही अमेरिकन राजकारणात ठामपणे उभा राहिलेला हा योद्धा तसूभरही डगमगला नाही.

सर्वात तरूण सिनेटर

जो बायडन हे डेलवेअरमधून 6 वेळा सिनेटर म्हणून निवडून आले आहेत. 1972मध्ये निवडून आलेले ते सर्वात तरूण सिनेटर होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची त्यांची ही तिसरी निवडणूक आहे. 1988मध्ये त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वाङमय चोरीच्या आरोपमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. दुसऱ्यांदा त्यांनी 2008मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रयत्न केला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जो बायडन यांना ओळखलं जातं. ओबामांच्या कार्यकाळात ते 2008 आणि 2016मध्ये दोनदा उपराष्ट्रपती होते. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयी व्हावेत म्हणून स्वत: बराक ओबामा यांनी बराच प्रयत्न केला.

वादग्रस्त बायडन

जो बायडन अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्यावर वाङमय चौर्याचाही आरोप झाला होता आणि तो त्यांनी मान्यही केला होता. लॉ स्कूलमध्ये पहिल्याच वर्षी कायद्याच्या समीक्षेचा लेख चोरल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. ब्रिटीश लेबर पार्टीचे नेते नील किन्नॉक यांच्या भाषणाचीही त्यांनी चोरी केली होती. तसेच सीनेट कार्यालयात काम करणाऱ्या एका महिलेचा विनयभंग केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यासक

जो बायडन अनेक वादात अडकले असले तरी अभ्यासू नेता म्हणून ते सर्वपरिचित आहेत. वॉशिंग्टन डीसीमधला अनेक वर्षांचा अनुभव असलेले नेते, उत्तम प्रशासक, परराष्ट्र धोरणाचा गाढा अभ्यासक, कुशल वक्ता आणि भावनिक नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.

भारताचा मित्र?

जो बायडन यांना भारताचे हितचिंतक म्हणूनही पाहिले जाते. भारताच्या 74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय-अमेरिकन जनसमुदायाशी संबोधित करताना राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यास भारतासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी भारताला साथ देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. भारत आणि अमेरिकेदरम्यान असैन्य अण्विक कराराला मंजुरी मिळावी म्हणून गेल्या 15 वर्षांपासून आपण प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे जो बायडन यांच्याकडून भारताच्याही खूप अपेक्षा आहेत. (Who is Joe Biden? know about everything)

संबंधित बातम्या:

US election result 2020: अमेरिकेत सत्ताबदलाचे संकेत!, बायडन यांची आघाडी, तर ट्रम्प पिछाडीवर!, हिंसेच्या शक्यतेनं न्यूयॉर्कमध्ये तगडा बंदोबस्त

US Election 2020 LIVE : दोन विशाल राज्य गमावूनही ट्रम्पना विजय शक्य, 2016 च्या रणनीतीची पुनरावृत्ती होणार?

(Who is Joe Biden? know about everything)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.