PROTEIN : प्रोटीनसाठी मांसाहार, सप्लिमेंटची गरज नाही, मक्याच्या नव्या वाणात 250 टक्के जास्त प्रोटीन
जास्त प्रोटीन मिळण्यासाठी तुम्हाला आता मांसाहार आणि सप्लिमेंटसारख्या गोष्टींचा आधार घेण्याची गरज नाही. कारण भारतीय संशोधकांनी मक्याचा एक नवा वाण शोधला आहे. त्यात तब्बल 250 टक्के जास्त प्रोटीन आहे.
जास्त प्रोटीन मिळण्यासाठी तुम्हाला आता मांसाहार आणि सप्लिमेंटसारख्या गोष्टींचा आधार घेण्याची गरज नाही. कारण भारतीय संशोधकांनी मक्याचा एक नवा वाण शोधला आहे. त्यात तब्बल 250 टक्के जास्त प्रोटीन आहे. मका खाण्याचे अनेक फायदे आहेत. मक्यातून प्रोटीन, कार्बोहायड्रेड, फायबर, विटामिन अशा अनेक गोष्टी मिळतात.
संशोधकांकडून नव्या वाणाचा शोध
संशोधकांनी आता बायोफोर्टीफायड मक्याचा शोध लावला आहे. या नव्या वाणातून पूर्वीपेक्षा 250 टक्के जास्त प्रोटीन मिळणार आहे. वाराणसीतील काशी विश्व विद्यालयातील संशोधकांनी या नव्या वाणाला ”मालवीय स्वर्ण मक्का वन” हे नाव दिलं आहे. बीयएचयूच्या कृषी विज्ञान संस्थेतील ही मक्याचा नवा वाण प्रोटीनचा मोठा श्रोत असणार आहे.
सप्लिमेंटच्या साईड इफेक्टपासून सुटका होणार
अनेकजण बॉडीबिल्डिंगच्या नादात सप्लिमेटचा वापर करातात, मात्र काही वेळेस त्याचे अत्यंत दुष्परिणाम झाल्यााचं पहायला मिळतात. या नव्या मक्यामुळे तुमची सप्लिमेंटपासून कायमची सुटका होऊ शकते. तुम्हाला या मक्यातून पुरेसे प्रोटीन मिळणार आहे. त्यामुळे आता प्रटीनसाठी सप्लिमेटवर अवलंबून राहवं लागणार नाही.
शाकाहारी लोकांसाठी अत्यंत सकस पर्याय
आपल्या देशात शाकाहारी असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शाकाहारी असल्यानं अनेकांना कमी प्रोटीन मिळतं. त्याच्यासाठीही ही मका आता सकस पर्यय ठरणार आहे. ही मका शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि कॅल्शियम वाढवण्यासही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी आता निरनिराळी औषध घेण्याची गरज उरणार नाही. डायबेटीस सारख्या समस्या टाळण्यासाठीही मक्याचा हा नवा वाण रामबाण उपाय ठरणार आहे.