त्वचा आणि केसांसाठी ‘हे’ 3 आयुर्वेदिक उपाय फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

सुंदर, मुलायम आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो.

त्वचा आणि केसांसाठी 'हे' 3 आयुर्वेदिक उपाय फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 11:39 AM

मुंबई : सुंदर, मुलायम आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. सुंदर त्वचा म्हटंले की, आपल्याला आठवण होते पार्लरची मात्र, पार्लरमधील उत्पादनांचा वापर करून आपण काही काळपुरतीच सुंदर त्वचा मिळू शकतो. मात्र, घरगुती उपाय करून आपण नेहमीसाठी आपली त्वचा आणि केस सुंदर, मुलायम आणि चमकदार करू शकतो. (3 Ayurvedic remedies beneficial for skin and hair)

दूध दूध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. दिवसातून किमान एकदातरी दूधाचा टोनर म्हणून वापर केला पाहिजे. दूध वापरल्याने आपला चेहरा मऊ पडतो. दुधात असणाऱ्या लॅक्टीक अॅसिडचा त्वचेसाठी चांगला फायदा होतो. सर्वात अगोदर दोन चमचे दुध घ्या आणि एक चमचा साखर घ्या आणि हे मिश्रण एकत्र करा आणि चेहऱ्याला लावा चेहऱ्याला 25 मिनिटे लावा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. दररोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हे केल्याने आपला चेहरा मऊ आणि तजेलदार होईल.

कडुलिंबाची पाने कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदात औषध म्हणून कडुलिंबाचा वापर केला जातो. याचा वापर केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि एनाल्जेसिक एजंट असतात. ते मुरुम कमी करण्यास मदत करतात. कडुलिंबाचे तेल आवळ्याच्या तेलात मिसळून केसांना लावू शकतो. हे केसांना पांढरे होण्यापासून वाचवते. कडुलिंबाच्या तेलात विटामीन ई आणि फॅटी अॅसिड असते. हे त्वचेचा पोत सुधारण्याचे कार्य करते. कडुलिंबाचे तेल केसात होणारे फंगल इंफेक्शन रोखण्याचे काम करते. यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे आदि समस्या दूर करण्यास मदत करते.

लिंबाचा रस लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल. खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल. एका कांद्याचा रस काढून, कापसाच्या मदतीने डोक्याच्या त्वचेवर लावावा. त्यानंतर 20 मिनिटांनी केस धुवून टाकावे. त्यामुळे कोंड्याची समस्या नाहीशी होऊन, केसगळती रोखण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(3 Ayurvedic remedies beneficial for skin and hair)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.