आयुर्वेदानुसार दुधासोबत कधीच खाऊ नका या गोष्टी, होऊ शकते नुकसान
दुधामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. दुधासोबत अनेक गोष्टींचे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की आयुर्वेदात दुधासोबत काही गोष्टी खाण्यास मनाई आहे.चला जाणून घेऊया दुधासोबत कोणत्या गोष्टी टाळाव्यात.
Milk Benifits : दुध मनुष्यासाठी वरदान आहे. कारण त्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. दूध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दुधात कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. आपल्या आहारात देखील आपण दुधाचा समावेश करतो. पण तुम्हाला माहित आहे की, आयुर्वेदानुसार असे कोणते पदार्थ आहेत जे दुधासोबत खाऊ नयेत. कारण यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. दूध प्यायल्यानंतर या गोष्टी खाल्ल्याने पित्त दोष वाढतो असे म्हणतात. तुम्हाला आज आम्ही त्याच गोष्टी सांगणार आहोत.
मासे आणि दूध
दुध हे थंड असते तर मासे हे उष्ण असतात. त्यामुळे ते दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. चिकन आणि रेड मीट एकत्र खाणे ही टाळले पाहिजे. कारण यामुळे पचनास त्रास होऊ शकतो आणि ब्लोटिंगचाही सामना करावा लागतो.
केळी आणि दूध
दूध आणि केळी हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण हे दोन्ही कधीच एकत्र खावू नये. कारण असे केल्याने पचनाची समस्या होऊ शकते.
दही आणि दूध
आयुर्वेदानुसार दूध आणि दहीचे एकत्र सेवन करू नये. दही-दूध एकत्र खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते, त्यामुळे दूध आणि दही एकत्र खाणे टाळा.
लिंबूवर्गीय फळे
लिंबूवर्गीय फळे आणि दूध कधीही एकत्र खाऊ नयेत. यामुळे उलट्या किंवा पोटदुखी होऊ शकते. फळे खाल्ल्यानंतर किमान 2 तासांनी दूध प्या.
गूळ आणि दूध
दुधात साखरेऐवजी जर तुम्ही गूळ घालून खात असाल तर असे करणे देखील पोटासाठी हानिकारक ठरु शकते.
अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. आरोग्याची कोणतीही समस्या असली तर आधी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.