चेहऱ्याला दूध लावल्याने होणारे फायदे!
मिल्क फेस पॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड चेहऱ्याचे छिद्र साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे मुरुम किंवा पिंपल्सची समस्या दूर होते. यासोबतच दूध एक्सफोलिएटरचे ही काम करते, जे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते.
मुंबई: दूध हा एक संपूर्ण आहार आहे जो व्हिटॅमिन ए आणि बी आणि लॅक्टिक ॲसिड सारख्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे दूध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. आज आम्ही तुमच्यासाठी मिल्क फेस पॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड चेहऱ्याचे छिद्र साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे मुरुम किंवा पिंपल्सची समस्या दूर होते. यासोबतच दूध एक्सफोलिएटरचे ही काम करते, जे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते. त्याचबरोबर दुधात अँटी एजिंग गुणधर्म असतात, त्यामुळे त्याच्या वापरामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर दूध त्वचेवरील जळजळ दूर करून चेहऱ्याला नैसर्गिक चमक प्रदान करते, तर चला जाणून घेऊया दुधाचा फेसपॅक कसा बनवावा.
दुधाचा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- कच्चे दूध 2 चमचे
- गुलाबजल 4 ते 5 थेंब
दुधाचा फेस पॅक कसा बनवावा?
- दुधाचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक छोटी वाटी घ्यावी.
- नंतर त्यात २ चमचे कच्चे दूध आणि ४ ते ५ थेंब गुलाबपाणी घालावे.
- यानंतर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिसळा
- आता तुमचा दुधाचा फेसपॅक तयार आहे.
मिल्क फेस पॅक कसा वापरावा?
- मिल्क फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.
- त्यानंतर तयार केलेला पॅक बोटांच्या किंवा कॉटन बॉलच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा.
- यानंतर रात्रभर चेहऱ्यावर ठेवा.
- त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवून स्वच्छ करावा.
- यामुळे तुमचा चेहरा चमकेल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)