नारळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर, पण अति वापर नको!

त्वचेच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात त्वचेची चांगली काळजी घेणारे अनेक पोषक घटक असतात.

नारळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर, पण अति वापर नको!
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 5:42 PM

मुंबई : त्वचेच्या आरोग्यासाठी नारळ तेल अर्थात खोबरेल तेल सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात त्वचेची चांगली काळजी घेणारे अनेक पोषक घटक असतात. बरेचजण सकाळी अंघोळ झाल्यानंतर हात, पाय आणि चेहऱ्याला नारळ तेल न चुकता लावतात. नारळ तेल आपल्या त्वचेला लावणे अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, कोणत्याही गोष्टीचा हा अतिरेक व्हायला नको असतो. काही लोक रात्री झोपताना आपल्या चेहऱ्याला नारळ तेल लावू झोपतात. (Applying coconut oil on the face is dangerous)

यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण नारळाचे तेल जसे त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसेच केसांसाठी देखील फायदेशीर आहे. नारळाचे तेल लावल्याने केसांची वाढ लवकर होते. हे आपल्याला माहिती आहे. जर आपण  चेहऱ्याला तेल लावून रात्रभर ठेवत असाल तर आपल्या चेहऱ्यावरील केस वाढण्याची शक्यता असते. तसेच आपली त्वचा तेलकट देखील होऊ शकते. यामुळे रात्री चेहऱ्याची नारळ्याच्या तेलाने मालिश केली तरी चेहरा धुवून टाकला पाहिजे.

शॅम्पूसह अनेक केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांमध्ये असलेले केमिकल अंततः केसांचे नुकसान करते. कारण त्यात जास्त प्रमाणात रसायने असतात. त्यांच्या अत्यधिक वापरामुळे, केसांमध्ये नैसर्गिक ओलावा नष्ट होतो आणि ते निर्जीव तसेच गुंतलेले दिसतात. ही समस्या विशेषतः आर्द्र वातावरणात निर्माण होते. या समस्येतून मुक्त होण्यासाठी ओल्या केसांमध्ये नारळ तेलाचे काही थेंब घाला. असे केल्याने हा ओलावा केसांमध्येच टिकून राहतो आणि केस मऊ होतात.

ओठांच्या समस्य दूर करण्यास गुलाबाच्या पाकळ्या देखील मदत करतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून, त्यात लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण झोपण्या पूर्वी ओठांवर लावा. काही दिवसांत आपली ही समस्या दूर होईल. केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो. जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा. आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही. नाहीतर यामुळे आपले ओठ खराब होऊ शकतात.

टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Applying coconut oil on the face is dangerous)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.