Beauty Tips : मध आणि लिंबू वापरून त्वचेच्या अनेक समस्या दूर करा
महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने वापरतात.
मुंबई : महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादने वापरतात. परंतु वारंवार वापरल्या जाणाऱ्या सौंदर्य उत्पादनांमुळे आपली त्वचा खराब होऊ शकते. आपल्या सर्वांच्या त्वचेचे प्रकार वेगवेगळे आहेत. काहींची त्वचा तेलकट आहे आणि काहींची कोरडी त्वचा असते. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची त्वच्या निरोगी आणि चमकदार राहिल. (Beauty Tips | Honey and lemon are beneficial for the skin)
-जर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्समुळे त्रस्त असाल तर एका भांड्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा आणि लावा. आठवड्यातून दोनदा हे मिश्रण लावल्यास तुमच्या चेहऱ्यावरून ब्लॅक हेड्स गायब होतील.
-बाजारात मिळणारी बरीच उत्पादने वापरल्यानंतरही, जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स जात नसतील तर लिंबू आणि मधाची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा साधारण 15 मिनिटांनंतर हे धुवा. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने तुमचा चेहरा साफ होईल.
-निरोगी आणि चमकणारी त्वचेसाठी, एक चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे मध मिसळा. मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. लिंबू त्वचेचे डाग आणि चेहरा स्वच्छ करतो.
-लिंबाचा रस, मध आणि साखर मिसळून आपण घरच्या घरी स्क्रब तयार करू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल.
-एक चमचा मधात लिंबाचा रस मिसळा आणि मास्क सारख्ये चेहऱ्यावर लावा. लिंबाचा रस मुरुमाचे डाग दूर करण्यास मदत करते.
-जर तुम्ही डोक्यातील कोड्यामुळे त्रस्त असाल तर लिंबाचा रस, मध आणि नारळ तेलाने केसांची मालिश करा. आपण मालिश केल्यानंतर साधारण 30 मिनिटांनंतर पाण्याने केस धुवा.
संबंधित बातम्या :
Skin Care | आरोग्यच नव्हे तर, निरोगी-चमकदार त्वचेसाठीही उपयुक्त ‘ड्रायफ्रुट्स’!#skincare | #skincareroutine | #DryFruits | #beautytips https://t.co/ZpyazLCIyi
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Beauty Tips | Honey and lemon are beneficial for the skin)