Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्यची समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोडा अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे वापर करा! 

चेहऱ्यावरील पिंपल्स एक मोठी समस्या बनते. कारण पिंपल्समुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि खुणा पडतात. जे त्वचेवरून काढणे खूप कठीण होते. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणारे औषधे देखील वापरतो. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स जावे आणि आपला चेहरा चमकदार आणि तजेलदार दिसावा.

Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्यची समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोडा अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे वापर करा! 
चमकदार त्वचेसाठी बॉडी लोशन आवश्यक, तुमच्या त्वचेनुसार निवडा योग्य लोश
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 7:27 AM

मुंबई : चेहऱ्यावरील पिंपल्स एक मोठी समस्या बनते. कारण पिंपल्समुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि खुणा पडतात. जे त्वचेवरून काढणे खूप कठीण होते. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणारे औषधे देखील वापरतो. जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स जावे आणि आपला चेहरा चमकदार आणि तजेलदार दिसावा. मात्र, बऱ्याचवेळा हे सर्व करूनही काहीच उपयोग होत नाही. मात्र, आपण काही घरगुती गोष्टी फाॅलो केल्या तर आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावरील पिंपल्यची समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोडा अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट चांगली तयार करा. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावरच राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. बऱ्याच लोकांना बेकिंग सोडा सूट होत नाही. अशावेळी जर तुम्ही चेहऱ्याला बेकिंग सोडा लावला आणि त्वचेवर जळजळ होत असेल तर लगेचच चेहरा धुवा.

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण हळद, लिंबू, मुलतानी माती, चंदन पावडर, खोबरेल तेल आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे. ही पेस्ट तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यास मदत होते.

केळी अगोदर चांगली मॅश करा नंतर दोन चमचे दही आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे सतत केले तर आपल्या चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील. दोन चमचे दही आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि थोडावेळ तशीच ठेवा. अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने धुवा. हा पॅक आपला चेहराचा रंग गोरा करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Baking soda is extremely beneficial for the skin)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.