Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!

Bay leaf in Skin care: तमालपत्र, आपल्या त्वचेवर कशा पद्धतीने लावावे याबद्दलची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे कारण की जर तमालपत्र लावताना कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुम्हाला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला योग्य पद्धती बद्दल सांगणार आहोत.

Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!
तमालपत्राचे गुणकारी फायदे जाणून घ्या..
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:25 AM

अन्न पदार्थांची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची व मसाले यांची मदत घेतली जाते.या मधील एक सर्वात महत्त्वाचा घटक पदार्थ म्हणजे तमालपत्र. तमालपत्र आपल्या अन्नपदार्थांना चव देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या तमालपत्र (Bay leaf skin benefits) मध्ये उपलब्ध असणारे पोषक तत्व आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून दूर करतात. तमालपत्रा मध्ये प्रोटीन,फायबर, कॅल्शियम, लोह,विटामिन सी (Vitamin C)भरपूर मात्रा मध्ये उपलब्ध असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तमालपत्र हे आपले आरोग्यच नाही तर आपली त्वचा सुद्धा उत्तम बनवण्यास सहाय्यक ठरतो. यामध्ये उपलब्ध असणारे गुणधर्म आपल्या त्वचेला अतिशय चांगले बनवतात तसेच त्वचेच्या (Skin care) आत मध्ये जाऊन विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात.आपल्यापैकी अनेकांना तमालपत्र फक्त खाद्य पदार्थांना चव घेण्यापुरता वापरला जातो याबद्दलची माहिती आहे परंतु तमालपत्राचा उपयोग आपली त्वचा उत्तम बनवण्यासाठी व त्वचेला कोणत्याही इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी केला जातो याबद्दल फारशी माहिती नसते.

तमालपत्राला आपल्या त्वचेवर कशा पद्धतीने लावले गेले पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेणे सुद्धा गरजेचे आहे.जर तमालपत्राचा उपयोग करताना जराशी जरी चूक आपल्याकडून झाली तर भविष्यात अनेक गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये तमालपत्राचा योग्य वापर याबद्दलची महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

तमालपत्र आणि दही

तमालपत्रा शिवाय दही सुद्धा आपल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.एका वाटीमध्ये तमालपत्र पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये मध आणि दही मिसळायचे आता ही पेस्ट मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लावायची आहे व ही पेस्ट चेहऱ्यावरील सुकून जाईल तेव्हा थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. तमालपत्र तुमच्या त्वचेला टवटवीत बनवतो तसेच दही आणि मध तुमच्या त्वचेची कोमलता नेहमी टिकवून ठेवते.

तमालपत्र पावडर आणि गुलाब जल

ही पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये तमालपत्र पावडर आणि गुलाबजल या दोघांची पेस्ट बनवून आपल्याला चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिट लावून ठेवायचे आहे. ही पेस्ट जेव्हा सुकून जाईल त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा स्वच्छ धुवायचे आहे यामुळे तुम्हाला चेहरा सुंदर दिसू लागेल तसेच चेहर्‍यावरील तेज सुद्धा आलेले पाहायला मिळेल.या पेस्टमध्ये गुलाबजल असल्याने तुमची त्वचा पहिल्यापेक्षा अधिक टवटवीत दिसू लागेल.

मध आणि तमालपत्र

तमालपत्रा पावडरमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे मध मिसळायचे आहे आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. या पेस्टला चेहऱ्यावर लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवायचे आहे आणि त्यानंतर चेहरा हलकासा ओला करायचा आहे व हलकासा मसाज करायचा आहे असे केल्यानंतर पेस्ट सुकल्यावर थंड पाण्याने आपल्याला आपला चेहरा धुवायचा आहे. चेहरा व्यवस्थित धुऊन झाल्यानंतर मॉइस्चराइजर लावायला अजिबात विसरू नका.

लिंबू आणि तमालपत्र

हा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये तमालपत्र पावडर घ्यायची आहे यामध्ये 1 ते 2 चमचा लिंबूचे रस टाकायचे आहेत त्यानंतर ही पेस्ट आपल्याला चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटं ठेवायचे आहे. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. चेहरा सुकल्यानंतर मॉइस्चराइजर लावण्यास अजिबात विसरू नका त्याचबरोबर ही पेस्ट लावण्याआधी तज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्या.

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या :

कोरोनातून बरे झाल्यानंतर पल्मोनरी फायब्रोसिस होऊ शकतो, प्रकार काय आणि उपचार काय?

रात्री झोपताना गरम पाणी आवर्जून प्यावं! जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे

यूरिन इन्फेक्शन बनू शकते अनेक आजारांचे माहेरघर, या सवयी आताच दूर करा !

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.