AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care | चमकदार आणि निरोगी केस हवेत? घरच्या घरी तयार करा हेअर ऑईल

केसांच्या विविध समस्यांसाठी सर्व उपाय योजना करुन झाल्या असतील तर, होममेड हेअर ऑईल तयार करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकतात. केसांची चमक, वाढ व एकंदर निरोगी केसांसाठी हे तेल मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरु शकते.

Hair Care | चमकदार आणि निरोगी केस हवेत? घरच्या घरी तयार करा हेअर ऑईल
केसांच्या समस्यांवर घरगुती उपाय
| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 11:23 AM
Share

मुंबई : स्त्रियांचे सौंदर्य त्यांच्या केसात असल्याचे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. परंतु बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, वाढते प्रदुषण आदींचा परिणाम आपल्या केसांवर होताना दिसत आहे. केस गळणे, पांढरे होणे, गुंता, कोंडा, विरळ होणे आदी विविध समस्यांनी महिला अगदी त्रस्त झालेल्या आहेत. केसांच्या निरोगी आरोग्यासाठी अनेक कृत्रिम पद्धतींचा अवलंब केला जात असतो. परंतु त्यातूनही काही साध्य होत नसते. अनेक वेळा वेगवेगळ्या तेलांचा प्रयोग केसांवर होत असतो. परंतु त्याचा फार परिणाम होत नाही. घरगुती पध्दतीने तयार केलेले तेल (homemade hair oils) लावणे हा आपल्या नित्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे केसांना पोषण देते. त्यामुळे केसांची चमक (Shine) टिकून राहण्यास मदत होते. नैसर्गिक घटकांचा वापर करून नियमित तेल मसाज (Massage) केल्याने केस ‘हायड्रेट’ होतात आणि मजबूत होतात. हे तुमचे केस वाढण्यास मदत करते. केस गळणे, कोंडा आणि पांढरे होणे यासारख्या सामान्य केसांच्या समस्या टाळण्यास मदत करू शकतात. कांदा, लिंबू आणि कढीपत्ता वापरून तुम्ही हे तेल बनवू शकता.

कांद्यापासून तेल

कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे टाळूच्या संसर्गावर परिणामकारक ठरतात. जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले हे घरगुती कांद्याचे तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. केस स्वच्छ करते. एक कांदा बारीक चिरून घ्या, खोबरेल तेल आणि लसूण पाकळ्या त्यात टाकून मिश्रण गरम करावे. ते थंड होऊ द्या आणि नंतर त्यात गरजेपुरता तेल घाला. मिश्रण एका बाटलीत टाकून वापरण्यापूर्वी 10 दिवस फ्रिजमध्ये ठेवा.

लिंबाचे तेल

सायट्रिक ॲसिडने परिपूर्ण असलेले हे लिंबू तेल केसांच्या मुळांना मजबूत करते. केस गळण्यापासून वाचवते. या तेलाचा वापर केल्याने टाळूची छिद्रे उघडून कोंडा देखील काढून टाकला जातो. प्रथम एका ताज्या लिंबाचा रस काढा आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये चांगले मिसळा. हे मिश्रण काही दिवस उन्हात ठेवा. मिश्रण चाळून घ्या. ते एका बाटलीत भरा, यानंतर लिंबू तेल वापरासाठी तयार असेल.

कडीपत्ता तेल

कढीपत्ता आणि खोबरेल तेल केस पांढरे होणे आणि केस गळणे थांबवते. कढीपत्त्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि व्हिटॅमिन बी गुणधर्म कोंडा होण्यापासून वाचवतात. केसांच्या वाढीस मदत होते. यासाठी मूठभर कढीपत्ता खोबरेल तेलात गरम करा. थंड होऊ द्या. नंतर पाने काढा आणि एका लहान भांड्यात तेल ओता. प्रत्येक वेळी वापराआधी तेल थोडे गरम करावे.

आवळ्याचे तेल

आवळ्याचे केसांसाठी अत्यंत महत्व आहे. पुरातन काळापासून निरोगी केसांसाठी आवळ्याचा वापर होत आला आहे. त्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. केस अकाली पांढरे होणे आणि केस गळणे आदी समस्यांवर आवळा गुणकारी असतो. आवळा भरपूर पोषक तत्वांनी युक्त असल्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. यासाठी आवळ्याचे छोटे तुकडे करून तासभर वाळवावे. आवळ्याचे तुकडे खोबरेल तेल आणि तिळाच्या तेलाने गरम करा. थंड होऊ द्या. मिश्रण वापरण्यापूर्वी आठवडाभर साठवून ठेवावे.

संबंधित बातम्या :

कोंड्याच्या समस्येमुळे त्रस्त आहात? थंडीत घ्या केसांची जास्त काळजी, हे घरगुती उपाय नक्की करा!

केस गळती, पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ हेअर मास्क एकदा लावा आणि समस्यांना कायमचे गुड बाय बोला…

कोरड्या आणि निर्जीव केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हे हेअर मास्क फायदेशीर!

निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा
नादच खुळा...निकालाआधी कोल्हापुरात विजयाचे बॅनर, कागलमध्ये कुणाची चर्चा.