Double Chin | हनुवटीखालील अतिरिक्त चरबीने त्रस्त आहात? डबल चिनपासून मुक्तीसाठी 5 उपाय
गळा तसेच हनुवटीखालील अतिरिक्त चरबी ही अनेकांचा चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषत: स्त्रीयांमध्ये या समस्येबाबत फार चर्चा होताना दिसून येते. या अतिरिक्त चरबीला कमी करण्यासाठी आम्ही काही खास व्यायाम व टीप्स् घेउन आलो आहोत, जाणून घेउया ही चरबी कमी करण्याचे उपाय.
मुंबई : धावपळीच्या युगात शरीराकडे लक्ष देण्यासाठी अनेकांकडे वेळ नसल्याची तक्रार सामान्य आहे. खानपान पध्दती व्यायामाचा (exercise) अभाव याचा एकंदर परिणाम हा आपल्या शरीरावर दिसतो. काही वेळा हे घटक आपल्या जीवनपध्दतींवर अवलंबून असता तर काही वेळा हे आनुवंशिकही (Genetic) असतात. सध्या हनुवटीखालील चरबी (double chin) हा बहुतेकांचा चिंतेचा विषय ठरत आहे. अनेक वेळा तर याचा परिणाम आपल्या सौंदर्यावरही होताना दिसून येतो. अतिरिक्त चरबीची समस्या ही सामान्य असली तरी तिची अनेक कारणे असू शकतात. वाढते वय, आनुवंशिकता, वजन वाढणे आदींचा यात समावेश होतो. या समस्येपासून सुटका करायची असल्यास पुढील उपाय तुम्हाला नक्की उपयोगात येउ शकतात.
चेहऱ्याचे व्यायाम
गळ्यावरील तसेच हनुवटीखालील अतिरिक्त चरबीला कमी करण्यासाठी चेहऱ्याचा व्यायाम हे उपयुक्त ठरु शकतात. यात सातत्य ठेवल्यास या समस्येपासून तुमची लवकरच सुटकादेखील होउ शकते. व्यायाम हा अतिरिक्त चरबीच्या समस्येवर मात करण्याचा उत्तम मार्ग आहे. तुम्ही हे कधीही आणि कुठेही अगदी सहज करू शकता. जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा दिवसभरात अनेक वेळा चेहऱ्याचा व्यायाम करा. इंटरनेटवर तुम्हाला दुहेरी हनुवटीची समस्या दूर करण्यासाठी चेहऱ्यावरील व्यायामाचे अनेक व्हिडिओ सापडतील. ते पाहून तुम्ही सहज हे व्यायाम करु शकतात
मसाज केल्याने दुहेरी लाभ
हनुवटीखालील अतिरिक्त चरबीला कमी करण्यासाठी मसाज हा चांगला पर्याय ठरु शकतो. यातून दुहेरी फायदा होतो. अतिरिक्त चरबीच्या ठिकाणी मसाज केल्याने रक्त अभिसरन क्रिया सुधारते आणि त्या भागात साठलेली अतिरिक्त चरबी बर्याच प्रमाणात कमी होऊ शकते. नारळ किंवा बदाम तेल वापरून तुम्ही मसाज करु शकतात.
ग्रीन टी ठरेल उपयुक्त
सध्या वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचा वापर सर्रास वाढलेला दिसतो. विशेषत: तरुणाइमध्ये ग्रीन टी बाबत मोठे आकर्षण असते. त्याच प्रमाणे स्टेटस् सिंबोलचा एक भाग म्हणूनही याकडे पाहिले जाते. परंतु ग्रीन टीचे अनेक चमत्कारीक उपयोग शरीराला होउ शकतात. वाढलेल्या वजनामुळे हनुवटीखालील तसेच गळ्यावरील अतिरिक्त चरबीची समस्या निर्माण होउ शकते. अशा परिस्थितीत ग्रीन टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट आणि वजन कमी करण्याचे गुणधर्म असतात. दिवसातून तीनदा ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरू शकते.
कोको बटर
कोको बटर हनुवटीखालील अतिरिक्त चरबीची समस्या दूर करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. कोको बटर त्वचेची लवचिकता वाढवण्याचे काम करते. ते वापरण्यासाठी, प्रथम ते गरम करा, नंतर या लोणीने हनुवटी आणि जबड्याच्या आसपासच्या भागाची मसाज करा.
ऑइल पुलिंग
ऑइल पुलिंगया पध्दतीचा वापर सर्वत्र मोठ्या संख्येने होताना दिसतो तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी नारळाच्या पाण्याच्या गुळण्या केल्या जातात. यातून तोंडाची स्वच्छताही राखली जाते शिवाय तोंडात पाण्याचा घोट घेउन तोंड फुगवून गुळण्या केल्यास यातून गालाच्या पेशी ताणल्या जातात व यातून अतिरिक्त चरबीची समस्याही कमी होते.
(टीप : वरील मजकूर हा केवळ माहितीवर आधारीत आहे. या समस्येवर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेउनच उपचार घ्यावेत.)
संबंधित बातम्या :
त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!
चकाचक चेहरा हवा आहे? मग ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा!
कोरड्या केसांची आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावा, वाचा फायदे!