Coffee: वर्कआऊट करण्यापूर्वी कॉफी का प्यावी?; काय आहेत फायदे?

जर तुम्ही वर्कआऊट (व्यायाम) करण्यापूर्वी कॉफीचे सेवन केलेत तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतील. एवढेच नव्हे तर तुमचा व्यायामही उत्तम होईल, कामगिरी सुधारेल.

Coffee: वर्कआऊट करण्यापूर्वी कॉफी का प्यावी?; काय आहेत फायदे?
Coffee: वर्कआऊट करण्यापूर्वी कॉफी का प्यावी?; काय आहेत फायदे?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 4:44 PM

नवी दिल्ली: बऱ्याच व्यक्ती सकाळची सुरूवात चहा (tea) पिऊन करतात, तर काहींना सकाळी कॉफी (coffee) प्यायला आवडते. तर काहींना ऑफीसमध्ये काम करतानाही दिवसभर कॉफी प्यायची सवय असते, ज्यामुळे त्यांचा मूड फ्रेश होतो आणि ते ताणमुक्त राहू शकतात. कॉफीचे एका ठराविक प्रमाणात सेवन केल्यास, आपल्या शरीराला अनेक फायदे (benefits) मिळतात. तसेच तुम्ही वर्कआऊट (व्यायाम) (workout) करण्यापूर्वी कॉफीचे सेवन केलेत तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतील. एवढेच नव्हे तर तुमचा व्यायामही उत्तम होईल, कामगिरी सुधारेल. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शारीरिक कामगिरी सुधारते

सर्वांनाच माहीत आहे की, कॉफीमध्ये कॅफेन आढळतं. कॅफेन हा एक असा घटक आहे जो आपल्या शरीराची उर्जा वाढवतो. कॉफीमध्ये असलेले कॅफेन आपल्या शरीराच्या स्नायूंची शक्ती तसेच स्टॅमिना वाढवते. कॉफीमुळे आपल्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्षमतेवरही परिणाम होतो.

मेंदूचे कार्य सुरळीत चालते

कॉफीमुळे आपल्या शरीराची ऊर्जा तर वाढतेच, शिवाय आपण ॲक्टिव्ह राहण्यासही मदत होते. कॉफीच्या सेवनाने आपल्या मेंदूचे कार्यही सुरळीतपणे चालते, हे तुम्हाला माहीत आहे का ? त्याशिवाय, कॉफीचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने वर्कआउटदरम्यान आपले लक्ष केंद्रित होते. यात असलेले कॅफिन एक नैसर्गिक उत्तेजक आहे, जे आपल्याला ॲक्टिव्ह ठेवते.

हे सुद्धा वाचा

स्नायूंच्या वेदना कमी होतात

वर्कआउटच्या काही वेळ आधी कॉफी प्यायल्यास आपले स्नायू म्हणजेच मसल्सचा त्रास कमी होण्यास मदत होते, असे मानले जाते. तसेच कॉफी प्यायल्याने रिकव्हरीही वेगाने होते. तुम्हाला कदाचित हेही माहीत नसेल की, वाइन, डार्क चॉकलेट, चहा आणि कॉफीमध्ये पॉलिफेनॉल्स असतात, ज्यामुळे आपल्या शरीराची सूज तसेच स्नायूंच्या वेदना कमी होऊ शकतात.

वर्कआऊट पूर्वी कधी प्यावी कॉफी?

वर्कआउट ( व्यायाम) करण्याच्या आधी कॉफी लगेच पिऊ नये. व्यायाम करण्याच्या अर्धा किंवा एक तास आधी कॉफीचे सेवन कारावे. मात्र 180 ग्रॅमपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका. जर तुम्ही जास्त कॉफी प्यायली तर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो किंवा झोप येण्यातही अडथळा निर्माण होऊ शकतो.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.