Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात केसगळती: निरोगी केसांसाठी नैसर्गिक उपचार, जाणून घ्या 5 सोप्या टिप्स!

थंडीच्या दिवसात केवळ त्वचेवर नाही तर केसांवरही परिणाम जाणवतो. त्वचेप्रमाणे केसही शुष्क बनतात. हिवाळ्याच्या दिवसात केसांची निगा राखण्याची आणि पर्याप्त पोषकद्रव्यांची आवश्यकता भासते.

हिवाळ्यात केसगळती: निरोगी केसांसाठी नैसर्गिक उपचार, जाणून घ्या 5 सोप्या टिप्स!
Hair care tips (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 5:59 PM

मुंबई : तुम्ही थंडीच्या दिवसात केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहात? तुमचे उत्तर होय असल्यास केसगळतीचे कारण आणि त्यावरील समूळ उपाय जाणून घेणे महत्वाचे ठरते. थंडीच्या दिवसात केवळ त्वचेवर नाही तर केसांवर परिणाम जाणवतो. त्वचेप्रमाणे केसही शुष्क बनतात. हिवाळ्याच्या दिवसात केसांची काळजीपूर्वक निगा राखण्याची आणि पर्याप्त पोषकद्रव्यांची आवश्यकता भासते. (Five health care tip for hair fall in winter used olive and coconut oil)

केसगळतीस केवळ पोषकद्रव्यांची कमतरताच कारणीभूत नाही. त्यासोबत केसगळतीमागे इतरही अनेक कारणं आहेत.

केसगळतीची कारणे

  • ताणतणाव
  • लोहाची कमतरता
  • केसांवरील प्रयोग
  • व्हिटॅमिन-बी ची कमतरता
  • प्रथिनांची कमतरता
  • केसातील कोंडा
  • क्षारयुक्त पाणी
  • अनुवांशिकता
  • केसांच्या मूळात संसर्ग

केसगळतीची कारणे जाणून घेण्यासोबत अनुरुप उपायांची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरते. केसगळती समूळ नष्ट करण्यासाठी प्रभावी उपाय पुढीलप्रमाणे

1. नारळ

केसांना पोषकतत्वे प्रदान करण्यासाठी नारळ गुणकारी ठरते. नारळाच्या तेलाला सौम्य गरम करा आणि केसांच्या मूळात वापर केल्याने केस मजबूत होतात. किमान एक तास केसांमध्ये नारळ तेल लावून ठेवा. याप्रमाणे नारळ दूधाने मसाज करुन त्यानंतर केस धुतल्याने लाभ होतो.

2. जास्वंद

जास्वंदीची लाल रंगाची फुले निरोगी केसांसाठी वरदान ठरतात. जास्वंदाची फुले वाटून नारळाच्या तेलासह केसांमध्ये वापरा. अर्धा ते एक घंटा केसांमध्ये लावून ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे कोंड्यापासून केसांना मुक्तीसोबतच चमकदारपणा प्राप्त होतो.

3. अंडे

अंड्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच अंड्यामध्ये झिंक, लोह तसेच सल्फर देखील असते. ही सर्व पोषक तत्वे एकत्रितपणे केसांना मजबूती प्रदान करतात. केसगळती टाळतात. अंड्याच्या पांढरा भाग ऑलिव्ह तेलासह मिक्स करुन केसांची मसाज करा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा.

4. कांदा

कांद्याचा रस वापरल्यामुळे केवळ केसगळतीच थांबत नाही. तर केस उगवणे आणि केसांची वाढ होण्यास सहाय्यक ठरते. आठवड्यातून दोन वेळा अर्ध्या तासासाठी कांद्याचा रस वापरा. त्यानंतर केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर करा. केसगळतीवर सर्वोत्तम उपाय मानला जातो.

6.लसूण

लसूण मध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी सल्फर अत्यंत उपयुक्त ठरते. नारळाच्या तेलात लसूण शिजवून किंवा लसणाच्या ज्यूसला नारळाच्या तेलात वापरण्याद्वारे अधिक फायदा प्राप्त होतो.

इतर बातम्या

त्वचेवर ग्लो हवा आहे? मग हे 5 प्रकारचे टोनर वापरा, जाणून घ्या याबद्दल अधिक!

Hair Care Tips : केसांशी संबंधित ‘या’ चुका करू नका , नुकसान होऊ शकते!

(Five health care tip for hair fall in winter used olive and coconut oil)

धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?
राज ठाकरेंच्या पुढील राजकीय वाटचालीचं मनसेचं 'इंजिन' कोणत्या दिशेनं?.
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?
वाल्मिक कराडला कोणी चोपलं? बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, घडलं काय?.
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.