Ginger For Dandruff : आल्याच्या वापराने कोंड्याच्या समस्येपासून सुटका करा, फक्त हे तीन उपाय आणि कोंडा गायब…
केसात कोंडा होणे ही एक अशी समस्या आहे जी प्रत्येक दुसऱ्या माणसाला भेडसावते. उन्हाळ्यातल्या धुळीमुळे केसांमध्ये अधिकच कोंडा होतो. त्यामुळे खाजही येते. तुमच्या डोक्याची त्वचा खूप जास्त ड्राय असेल तर कोंडा जास्त होतो. इतरही काही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला कोंड्याची समस्या उद्भवू शकते. यावर काही घरगुती उपाय केल्याने ही समस्या कमी होऊ शकते.
मुंबई : केसात कोंडा (Dandruff) होणे ही एक अशी समस्या आहे जी प्रत्येक दुसऱ्या माणसाला भेडसावते. उन्हाळ्यातल्या धुळीमुळे केसांमध्ये अधिकच कोंडा होतो. त्यामुळे खाजही येते. तुमच्या डोक्याची त्वचा खूप जास्त ड्राय असेल तर कोंडा जास्त होतो. इतरही काही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला कोंड्याची समस्या उद्भवू शकते. यावर काही घरगुती उपाय (Home Remedies) केल्याने ही समस्या कमी होऊ शकते. केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आल्याचा (Ginger) वापर केल्यास चांगला फरक जाणवतो. आले वेगवेगळ्या प्रकारे केसांना लावता येते. चला जाणून घेऊया आपण केसांसाठी आल्याचा वापर कसा करू शकतो…
तेलातून आले केसांना लावा
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि आल्याचा रस थेट लावल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ते तेल म्हणूनही वापरू शकता. यासाठी तुम्ही खोबरेल तेल हलके गरम करा आणि आता आल्याचे काही थेंब टाका आणि मिक्स करा. आता याने तुमच्या डोक्याची मालिश करा. याशिवाय तुम्ही आले किसून तेलात मिक्स करून लावू शकता. यामुळे तुमची कोंड्याची समस्या दूर होईल.
आले शाम्पूसोबत वापरा
जर तुम्हाला तुमच्या केसांवर आणि त्वचेवर अगदी सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आले लावायचे असेल तर ही पद्धत सर्वोत्तम असू शकते. यासाठी थोडा सल्फेट फ्री शॅम्पू आणि एक चमचा आल्याचा रस घ्या. आता ते मिक्स करा आणि या शॅम्पूने तुमचे केस स्वच्छ धुवा. यामुळे कोंडा तर दूर होईलच शिवाय केसही स्वच्छ होतील आणि तुमचे केस निरोगी होतील.
केस धुण्यासही वापर
आल्याच्या साहाय्यानेही केस धुताही येतात. यामुळे तुमचे केस चमकदार तर होतीलच शिवाय कोंडा दूर होईल. यासाठी एक कप तांदळाच्या पाण्यात एक चमचा ऍपल साइड व्हिनेगर आणि आल्याचा रस मिक्स करा, शाम्पू केल्यानंतर या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
केसात कोंडा होणे ही एक अशी समस्या आहे जी प्रत्येक दुसऱ्या माणसाला भेडसावते. उन्हाळ्यातल्या धुळीमुळे केसांमध्ये अधिकच कोंडा होतो. त्यामुळे खाजही येते. तुमच्या डोक्याची त्वचा खूप जास्त ड्राय असेल तर कोंडा जास्त होतो. इतरही काही कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला कोंड्याची समस्या उद्भवू शकते. यावर काही घरगुती उपाय केल्याने ही समस्या कमी होऊ शकते.
टीप- या उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या…
संबंधित बातम्या