कॉफीमध्ये ‘हे’ पदार्थ मिसळून हेअर मास्क बनवा, वापरा आणि केसांना चमकदार बनवा…

आतापर्यंत तुम्ही चमकदार केसांसाठी वेगवेगळे उपाय करून तुम्ही थकले असाल तर एकदा कॉफीपासून बनवलेला मास्क ट्राय करा. कारण कॉफी तुमच्या केसांना अधिक चमकदार बनवू शकते.

कॉफीमध्ये 'हे' पदार्थ मिसळून हेअर मास्क बनवा, वापरा आणि केसांना चमकदार बनवा...
कॉफीपासून हेअर मास्क बनवा
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 11:49 AM

मुंबई : एक कप कॉफी दिवसभर उर्जा देते. पण हीच कॉफी (Coffee) तुमच्या केसांनाही निरोगी ठेवण्यास मदत करते. कॉफी केसांना चमकदार, मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. तसंच कॉफीमुळे केस वाढण्यास मदत होते. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे शैम्पू, कंडिशनर आणि सीरममध्ये देखील कॉफीचा वापर होतो. पण आम्ही तुम्हाला कॉफीचा एक वेगळा उपयोग तुम्हाला सांगणार आहोत. आतापर्यंत तुम्ही चमकदार केसांसाठी वेगवेगळे उपाय करून तुम्ही थकले असाल तर एकदा कॉफीपासून बनवलेला मास्क (Hair Mask) ट्राय करा. कारण कॉफी तुमच्या केसांना अधिक चमकदार बनवू शकते. तुम्ही घरच्या घरी हा मास्क बनवू शकता. हा मास्क तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कॉफीमध्ये इतर नैसर्गिक घटक मिसळून तुम्ही हेअर मास्क बनवू शकता. चला तर मग पाहुयात केसांना शाईन आणणारा हेअरमास्क कसा बनवायचा…

कॉफी आणि नारळ तेल केस मास्क

कढईत 2 कप खोबरेल तेल गरम करा. त्यात 1/4 कप भाजलेले कॉफी बीन्स टाका. थोडा वेळ झाकण ठेवून कमी गॅसवर त्याला उकळी आणा. पण यात हे मिश्रण जळणार नाही याची काळजी घ्या. आता गॅस बंद करा. कॉफी बीन्स वेगळे करण्यासाठी तेल चाळणीने गाळा आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा. केस धुण्याआधी या तेल लावून मसाज करा. तासभर तसंच राहू द्या. त्यानंतर तुम्ही केस धुवू शकता.

कॉफी आणि एरंडेल तेलाचा हेअर मास्क

1 चमचा कॉफी पावडर घ्या. 2 चमचे एरंडेल तेल घ्या. ते एकत्र मिसळा. हे मिश्रण केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. 30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस शाम्पूने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.

कॉफी आणि कोरफडचा हेअर मास्क

1 टीस्पून कॉफी पावडर आणि 2 टीस्पून एलोवेरा जेल घ्या. ते एकत्र मिसळा आणि हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा. 30 ते 40 मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.

कॉफी आणि दही हेअर मास्क

अर्धा कप साधे दही घ्या. त्यात 1 चमचा कॉफी पावडर टाका. ते चांगलं मिसळा. हे मिश्रण केसांना लावा. 30 ते 40 मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर केस शाम्पूने धुवा. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल

एक चमचा कॉफी पावडर 2 चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून मास्क तयार करा. केसांच्या मुळापासून टोकापर्यंत हेअर मास्क लावा. 30-40 मिनिटं मास्क केसांवर राहू द्या. ते धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा आणि तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा हेअर मास्क वापरू शकता.

संबंधित बातम्या

शरीरातील ही लक्षणे वाढत्या कोलेस्ट्रॉलची तर चिन्हे नाहीत? दुर्लक्ष करु नका, अताच सावध व्हा !

Foods for Hair : मजबूत केसांसाठी आहारात “या” पदार्थांचा करा समावेश, केसांच्या समस्या होतील दूर!!

Healthy Foods : या पदार्थांचे सेवन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्यही सुधारते, जाणून घ्या कोणते आहेत हे पदार्थ

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.