चेहरा धुण्यासाठी करा मुलतानी मातीचा वापर, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक
मुलतानी मातीमुळे आपल्या त्वचेवरील मुरुमे, पिंपल्स आणि डाग यांच्यापासून मुक्ती मिळते. याचा वापर चेहरा धुण्यासाठीही करू शकता. मुलतानी मातीने चेहरा नियमितपणे धुण्याचे फायदे जाणून घेऊया.
मुलतानी माती (Multani Mitti) ही आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. ज्यांची त्वचा तेलकट (oily skin) असते, त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच ठरते. मुलतानी माती त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. तसेच त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून (skin problems) मुक्ती मिळण्यास मदत होते. मुलतानी मातीमुळे आपल्या त्वचेवरील मुरुमे, पिंपल्स आणि डाग (pimples) यांच्यापासून मुक्ती मिळते. तुम्ही याचा वापर चेहरा धुण्यासाठीही करू शकता. मुलतानी मातीने चेहरा नियमितपणे धुण्याचे फायदे जाणून घेऊया.
- धूळ, प्रदूषण आणि यूव्ही किरणांमुळे त्वचा काळसर पडते, टॅन होते. मुलतानी मातीच्या वापरामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते. ती त्वचा सुधारण्यासाठी कार्य करते. तुम्ही मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी देखील मिसळू शकता. या दोन्हींचे मिश्रण करून तुम्ही टॅनिंग काढून टाकण्यासाठी फेस पॅक म्हणूनही वापरू शकता.
- मुलतानी माती त्वचेमधील अतिरिक्त तेल नियंत्रित करते. ही त्वचेला डाग आणि मुरुमांपासून मुक्त करण्याचे काम करते. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचेची छिद्रं खोलवर स्वच्छ होतात. अनेकदा मुरुमे किंवा पिंपल्समुळे त्वचेवर डाग पडतात, ते घालवणं फार कठीण असते. अशावेळी मुलतानी मातीने चेहरा नियमित धुतल्यास त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.
- खराब जीवनशैलीमुळे अनेक लोकांची त्वचा अगदी लहान वयातच सैल होते. अशा परिस्थितीत मुलतानी मातीने चेहरा रोज धुतल्यास त्वचा घट्ट होते. सैल झालेली त्वचा घट्ट करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.
- बऱ्याच वेळेस त्वचेवर पुरळ किंवा रॅशेस येतात. अशावेळी मुलतानी माती ही आपली त्वचा थंड करण्याचे काम करते आणि पुरळ कमी होण्यास मदत होते. मात्र मुलतानी मातीने चेहरा धुतल्यानंतर नेहमी मॉयश्चरायझरचा वापर करावा. तसे न केल्यास केल्यास त्वचा कोरडी दिसू लागते.
Non Stop LIVE Update