होळीसाठी बनवा नैसर्गिक रंग घरच्या घरी, ज्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही तर फायदेच होतील…

होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तुम्ही घरगुती रंगाचा वापर करून ही होळी साजरी करा. तर हे घरगुती नैसर्गिक रंग कसे बनवायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत, तेही घरगुती पद्धतीने...

होळीसाठी बनवा नैसर्गिक रंग घरच्या घरी, ज्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही तर फायदेच होतील...
रंग
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 12:36 PM

मुंबई : होळी (Holi) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अश्यात रंगाची निवड करताना तुमची गफलत होऊ शकते. चुकीचा रंग निवडला तर तुमच्या शरिराला इजा होऊ शकते. पण मग रंग खेळायचे कसे आणि कोणते असा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल. तर तुम्ही घरगुती रंगाचा वापर करून ही होळी साजरी करा.सण साजरा करायला तेव्हाच मजा येते जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असेल. त्यामुळे घरात बनवलेले रंग वापरल्याने तुमच्या त्वचेला इजा होणार नाही, उलट फायदाच होईल. तर हे घरगुती नैसर्गिक रंग कसे बनवायचे ते आज आपण जाणून घेणार आहोत, तेही घरगुती पद्धतीने…

लाल रंग

होळीच्या वेळी लाल रंग अनेकांना आवडतो. तुम्ही हा रंग लाल चंदन किंवा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांपासून तयार करू शकता. लाल चंदन वाटून त्याची पावडर बनवून तुम्ही ती वापरू शकता. लाल गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वाळवा. वाळल्यानंतर त्यांची पूड करून त्यात चंदनाची पावडर थोडी मिसळा. तुमचा लाल रंग तयार… गुलाबी रंग देण्यासाठी तुम्ही थोडं गव्हाच्या पीठाचा वापर करू शकता.

पाण्याचा लाल रंग

जर तुम्हाला पाण्याची होळी आवडत असेल, तर होळीच्या वेळी डाळिंबाच्या सालीचा वापर करा. डाळिंबाची साल पाण्यात टाकून उकळा. रात्रभर तशीच ठेवा. सकाळपर्यंत लाल रंग तयार होईल. यामुळे तुमच्या त्वचेला अनेक प्रकारचा फायदा होईल.

पिवळा रंग

नैसर्गिकरित्या पिवळा रंग करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये हळद पावडर मिसळा. यामुळे पिवळा गुलाल तयार होईल. याशिवाय झेंडूच्या फुलाची पाने उन्हात वाळवून, बारीक करून पिवळा रंग तयार करता येतो. याशिवाय हळद, चंदन, बेसन, मैदा मिसळूनही पिवळा रंग बनवू शकता. टीप- हा रंग घरच्याच हळदीपासून बनवा. भेसळयुक्त हळदीमुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.

हिरवा आणि निळा

पुदिना, धणे आणि पालकाची पाने उन्हात वाळवून आणि त्याची पावडर मिसळून तुम्ही हिरवा रंग तयार करू शकता. पाण्यात उकळून ठेवल्याने पाण्याचा रंग येतो. निळा रंग तयार करण्यासाठी, तुम्हाला हिबिस्कसची फुले उन्हात वाळवावी लागतील. नंतर त्यांना वाटून निळा रंग बनवता येईल.

व्यायामामुळे शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होतील हे सकारात्मक बदल

Sugar Free Food | शुगर फ्री पदार्थांमागे धावणे सोडा, एक-दोन नव्हे, तब्बल 92 साईड इफेक्ट्स

मखना आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ, कसा? वाचा…

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.