Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या कसे!

ऑलिव्ह ऑईल आपल्या आरोग्यासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ऑलिव्ह ऑईल वजन कमी करण्याबरोबरच ते रक्त आणि साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हे कोलेस्टेरॉल आणि कर्करोगासारख्या आजारांना कमी करण्यासाठी वापरले जाते.

Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या कसे!
Olive Oil
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 8:02 AM

मुंबई : ऑलिव्ह ऑईल आपल्या आरोग्यासाठी त्वचेसाठी आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ऑलिव्ह ऑईल वजन कमी करण्याबरोबरच ते रक्त आणि साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हे कोलेस्टेरॉल आणि कर्करोगासारख्या आजारांना कमी करण्यासाठी वापरले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये या तेलाची लोकप्रियता भारतीयांमध्ये खूप वाढली असून यामुळेच याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. (Olive oil is extremely beneficial for health, skin and hair)

ऑलिव्ह ऑईल हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. जे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. केस आणि त्वचेच्या काळजीशी संबंधित विविध समस्यांमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. जर तुम्हाला देखील या समस्यांपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. हे अनेक पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. ऑलिव्ह ऑईलचे नेमके कोणते फायदे होतात हे आज आपण बघणार आहोत.

ऑलिव्ह ऑईलचे फायदे

त्वचा मॉइश्चरायझिंग

ऑलिव्ह ऑईलमध्ये नैसर्गिक गुणधर्म असतात. जे त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. याशिवाय जर तुम्ही कोरड्या त्वचेने त्रस्त असाल तर या तेलापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हे त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते.

क्लींजर

ऑलिव्ह ऑईल वापरून मेकअप सहज काढता येतो. यासाठी तुम्हाला कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावावे लागते आणि नंतर अतिरिक्त कापूस घेऊन त्वचेची घाण साफ करावी लागते. चेहऱ्यावर आणि शरीरावर नियमितपणे ऑलिव्ह ऑईल लावल्याने नैसर्गिक चमक येते.

एंटी एजिंग

ऑलिव्ह ऑईल त्वचेला घट्ट करण्यास मदत करते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करते. हे त्वचेला पोषण देते आणि मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.

क्युटिकल

घरी मॅनिक्युअर करताना ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. नखांना नैसर्गिक रंग देण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर केला जाऊ शकतो. हे तुमच्या नखांना क्रॅक होण्यापासून वाचवते आणि क्रॅक झालेल्या त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

केसांची वाढ

ऑलिव्ह ऑईलने टाळूची मालिश केल्याने केस मऊ आणि मजबूत होतात. हे तुमचे केस पातळ होण्यापासून वाचवते आणि फ्रिजपासून सुटका देखील करते. ऑलिव्ह तेल हलके गरम केल्यानंतर लावा आणि सुमारे 2 ते अडीच तासांनी सौम्य शॅम्पूने धुवा. हे केवळ आपल्या केसांची वाढ वाढवण्यास मदत करत नाही तर केस चमकदार आणि मऊ ठेवण्यास देखील मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Olive oil is extremely beneficial for health, skin and hair)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.