Skin Care : ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
पावसाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो.
मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु तरीही विशेष काही चांगला परिणाम मिळत नाही. आपल्याला त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत .ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Olive oil is extremely beneficial for the skin)
ऑलिव्ह ऑईल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. हे त्वचेचे अकाली वृद्धत्व रोखते. ऑलिव्ह ऑईल त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मदत करते. यासाठी रात्री झोपेच्या आधी ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घ्या आणि ते आपल्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावा. सुमारे दोन ते तीन मिनिटे वरच्या दिशेने मालिश करा. त्यानंतर सकाळी उठल्यावर आपला चेहऱ्या कोमट पाण्याने धुवा.
यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण घरचे-घरी ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठाचा फेसपॅक वापरू शकतात. हा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने पावसाळ्याच्या हंगामातही एक ग्लो चेहऱ्याला येतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईल, पुदिना आणि बेसन पीठ लागणार आहे. यासाठी सर्वात अगोदर ऑलिव्ह
ऑईल 2 चमचे, पुदिन्याच्या पानांची तीन चमचे पेस्ट आणि एक चमचा पाणी लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. जर पेस्ट जास्त कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये पाणी मिक्स करा. आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण साधारण आठवड्यातून दोन वेळा लावू शकता.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Olive oil is extremely beneficial for the skin)