परफ्यूम वापरताना या गोष्टींची घ्या काळजी…नाही तर होऊ शकते मोठी चूक…
कार्यक्रमासाठी, लग्न समारंभ, ऑफिस असो किंवा अगदी सहज बाहेर पडतानाही आपण परफ्यूम लावून जातो. घामाचा (sweat) दुर्गंध येऊ नये, फ्रेश वाटवं म्हणून परफ्यूम लावतो. परफ्यूमचा सुगंध जास्त वेळ राहावा म्हणून आपण तो कपड्यावर लावतो. परफ्यूम घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते नाही तर समस्या निर्माण होऊ शकते.
मुंबई: परफ्यूम (Perfume) तुमचा विकपाईट आहे का? मग परफ्यूम घेताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण कायम परफ्यूम किंवा डिओ लावून बाहेर पडतो. महिला असो किंवा पुरुष यांना परफ्यूम खूप आवडतो. वेगवेगळ्या देशातील महागड्या ब्रांडच्या (Brand) परफ्यूमचे कलेक्शन अनेकांकडे दिसतात. महिला तर आपल्या परफ्यूम बद्दल खूप पझेसिव्ह असतात. ते आपल्या परफ्यूमचं नाव इतरांना सांगत पण नाही. प्रत्येकाचा असा एक खास परफ्यूम असतो. परफ्यूमचा सुगंध ही त्यांची ओळख बनते. खास कार्यक्रमासाठी, लग्न समारंभ, ऑफिस असो किंवा अगदी सहज बाहेर पडतानाही आपण परफ्यूम लावून जातो. घामाचा (sweat) दुर्गंध येऊ नये, फ्रेश वाटवं म्हणून परफ्यूम लावतो. परफ्यूमचा सुगंध जास्त वेळ राहावा म्हणून आपण तो कपड्यावर लावतो. आपल्या आयुष्यातील स्पेशल क्षण खास करण्यासाठी पण परफ्यूमचा वापर करतो. परफ्यूम घेताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते नाही तर समस्या निर्माण होऊ शकते. परफ्यूम घेण्यासाठीचे खास टीप्स.
1. परफ्यूमचा सुगंध तपासून पाहा – हो, परफ्यूमचा सुगंध कायम तपासून घ्या. जर तुम्हाला उग्र सुगंधांची एलर्जी असेल तर परफ्यूमचा सुगंध तपासून घ्या. कारण उग्र सुगंधाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. डोके दुखी, अस्थमाचा त्रास किंवा सर्दी होऊ शकते.
2. तुम्हाला आवडेल तो घ्या – परफ्यूम लावल्याने आपल्याला प्रसन्न वाटतं. त्यामुळे त्याचा सुगंध आपल्याला आवडला पाहिजे. इतरांचा आवडीचा परफ्यूम वापरू नका.
3. त्वचेवर प्रेम करा – हो आपल्या त्वचेवर प्रेम करा. आपल्या त्वचेला सूट होईल अशा परफ्यूमची निवड करा. नाही तर त्वचेला एलर्जी होऊ शकतं.
4. कपड्यावर परफ्यूम लावताना सावधान – परफ्यूमचा दीर्घकाळ सुगंध टिकावा म्हणून आपण तो कपड्यावर लावतो. आणि मग त्या परफ्यूमचा कपड्यावर डाग पडतो. आपले खास कपडे यामुळे खराब होऊ शकतात. म्हणून परफ्यूम वारताना ही चूक करु नका. परफ्यूम कायम त्वचेवर लावा.
5. रिसर्च करा – हो अगदी बरोबर कुठलीही वस्तू घेताना तिच्याबद्दल सगळी माहिती करुन घ्या. वेगळ्यावेगळ्या सुगंधाचे परफ्यूम मिळतात. आपल्याला कुठले आवडू शकतात, ते पाहावं. महत्त्वाचे कुठलं परफ्यूम तुम्हाला सूट होतं हे तपासावं.
6. परफ्यूम कुठे लावा – तुम्ही परफ्यूम मनगटाऐवजी किंवा शरीरावर इकडेतिकडे लावू नका. परफ्यूम तुम्ही अंडरआर्म्सवर आणि कानाच्या मागे लावावा. अंडरआर्म्स आणि कानामागे तापमान जास्त असतं. त्यामुळे परफ्यूम जास्त काळ टिकतं.
टीप : या बातमीतील सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.