चंदन पावडर आणि दुधाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
आज प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. चेहरा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो. याचा एक प्रयोग फार जुन्या काळापासून चालू आहे आणि तो म्हणजे चंदन
मुंबई : आज प्रत्येकजण आपला चेहरा सुंदर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. चेहरा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो. अनेक वर्षांपासून त्वचेसाठी लोक चंदनचा वापर करत आहेत. चंदन हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे चंदनाचा फेसपॅक आपल्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते. (Sandalwood powder and milk face pack are beneficial for the skin)
चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. साधारण 20-25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक करण्यासाठी खूप सोप्पा असल्यामुळे आपण दररोज देखील हा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकतो.
जर आपल्याला चेहऱ्यावरील डाग काढून टाकायचे असतील, तर 1 चमचा चंदन पावडरमध्ये 2 चमचे दूध घालून पेस्ट बनवा. आता त्यात एक चमचा बदाम पावडर मिक्स करा. या तिन्ही घटकांना चांगले मिसळा आणि ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. कोरडी झाल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल व मुरुमांपासून मुक्तता मिळेल.
एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही मिसळा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेस पॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. अप्लाय केल्यानंतर, ते 15 मिनिटे पुरपणे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होईल, आपल्या चेहर्याची चमक वाढेल आणि मुरुमांपासून मुक्ती मिळेल.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Sandalwood powder and milk face pack are beneficial for the skin)