Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी वापरा दह्याचा फेसपॅक, ‘असा’ बनवा फेसपॅक घरच्या घरी

चेहऱ्याचा तेलकटपण दूर करण्यासाठी आणि त्याला अधिक तजेलदार करण्यासाठी दही वापरा. त्याचा फेसपॅक करून लावल्यास अधिक उत्तम....

Skin Care Tips : उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी वापरा दह्याचा फेसपॅक,  'असा' बनवा फेसपॅक घरच्या घरी
केवळ चेहराच नाही तर मानेलाही स्क्रब आणि मॉइश्चरायझेशन करणे आवश्यक आहे.
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 6:35 PM

मुंबई : नुकताच उन्हाळा (Summer) सुरू झालाय. अश्यात त्वचेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या तळपत्या उन्हापासून तुमच्या त्वचेची आणि चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. उन्हाळ्याच्या दिवसात चेहरा अधिक तेलकट (Oily Skin) होतो. हा तेलकटपणा नियंत्रित करण्यासाठी तसंच तेलकट त्वचेच्या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर केला जातो. पण बऱ्याचदा त्याचा चेहऱ्यावर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. त्याचमुळे आम्ही घरगुती उपाय सांगणार आहोत.ज्यामुळे तुमचा चेहरा तेलकट होणार नाही शिवाय तुमचा चेहरा अधिक ग्लो करेल. चेहऱ्याचा तेलकटपण दूर करण्यासाठी आणि त्याला अधिक तजेलदार करण्यासाठी दही वापरा.दह्याचा फेसपॅक (Curd Face Pack) करून लावल्यास अधिक उत्तम.

फेसपॅक कसा बनवायचा

दही पॅक बनवण्यासाठी दोन चमचे दही, अर्धा चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्या. एका भांड्यात हे सगळे पदार्थ एकत्र करा. तयार झालेलं मिश्रण चेहऱ्याला लावा. 20 मिनिटं तसंच चेहऱ्यावर राहू द्या. पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

उन्हाळ्यात चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलावर नियंत्रण ठेवण्यासाठी, चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी दही उत्तम आहे. दही वापरल्याने सनबर्न, टॅनिंग, मुरुम, डाग दूर होण्यास मदत होते. चेहऱ्यावर दही लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्याही दूर होतात. दह्याचा वापर चेहऱ्यावर मसाज करण्यापासून ते स्क्रबिंगपर्यंत करता येतो.

दह्याचे फायदे

उन्हाळ्यात दही लावल्याने चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो. उन्हाळ्यातील उन्हामुळ त्वचेचा रंग काळसर होतो. अश्यात चेहऱ्यावर दही वापरल्याने त्वचेचा रंग उजळू लागतो.उन्हाळ्यात चेहऱ्यावर दही लावल्याने त्वचेतील मृत पेशी निघून जातात. त्यामुळे चेहऱ्याचा रंग स्वच्छ आणि त्वचा नितळ राहते.प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या दहीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मुरुम कमी करण्यास मदत करतात.दही त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्हीही तुमच्या चेहऱ्यासाठी दही वापरा, आणि फरक अनुभवा.

संबंधित बातम्या

Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार

Weight Lose Tips : ‘या’ चार फळांचा आहारात समावेश करा आणि वजन घटवा!

तुमच्या मनात असतं एक आणि बोलता भलतंच? सावधान! तुम्हाला असू शकतो ‘हा’ गंभीर आजार

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.