AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुंदर त्वचा हवीय? मग, अक्रोड स्क्रब नक्की ट्राय करा !

अक्रोड खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते.

सुंदर त्वचा हवीय? मग, अक्रोड स्क्रब नक्की ट्राय करा !
अक्रोड
| Updated on: Apr 12, 2021 | 11:15 AM
Share

मुंबई : अक्रोड खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अक्रोड बुद्धीला तल्लख ठेवण्याबरोबरच, शरीराला दिवसभराची ऊर्जा देण्याचे कार्य करते. अक्रोड हा सुक्यामेव्यातील असा एक घटक आहे जो आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला अक्रोडच्या साह्याने घरच्या घरी त्वचेला सुंदर, गोरे आणि तजेलदार कसे करायचे हे सांगणार आहोत.  (try these walnut scrub at home for more skin care benefits)

अक्रोड ही स्कीन स्क्रबसाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे. मात्र, या व्यतिरिक्त अक्रोड आपल्याला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतो. अक्रोडमध्ये ओमेगा 3 मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे त्वचेची चमक वाढते. अक्रोड त्वचेसाठी एक उत्तम पदार्थ मानला जातो. अक्रोड त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास देखील मदत करतो. यामुळे आपली त्वचा कोरडे राहत नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी स्क्रब कसे तयार करायचे हे सांगणार आहोत.

स्क्रब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

– अक्रोड

– आवळा

– मध

-पद्धत सर्वात अगोदर अक्रोड बारीक करून घ्या. मात्र खूप जास्त बारीक करू नका कारण स्क्रबसाठी ग्रॅन्यूल आवश्यक आहेत. एक चमचा मध घ्या आणि आवळा बारीक करून आता हे सर्व मिक्स करा आणि पेस्ट तयार करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर थोड्या प्रमाणात हे मिश्रण घ्या आणि स्क्रब करा. कमीतकमी 5 मिनिटांसाठी आपला चेहरा स्क्रब करा आणि स्क्रबिंगनंतर 2 मिनिटांसाठी तसाच ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि कोरडा ठेवा.

अक्रोडाची पावडर घ्या आणि त्यात दुध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. 10 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार वाटेल आणि चेहऱ्याचा ग्लो देखील वाढेल. तेलात अक्रोड फ्राय करा त्यात चवीनुसार पिठी साखर घाला. हे दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे कोरडा खोकला नाहीसा होईल. अक्रोडाच्या वाळलेल्या खोडाची साल घ्या, त्याची पावडर करा त्यात चिमूटभर लवंग मिसळून दंत पावडर म्हणून तुम्ही वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

(try these walnut scrub at home for more skin care benefits)

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.