AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाण्याचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!

त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाण्याचा 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 7:11 AM
Share

मुंबई : त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. साैंदर्य उत्पादनांचा अधिक वापर केल्याने आपली त्वचा काही काळ सुंदर दिसण्यास मदत होते. मात्र, जर आपण घरगुती फेसपॅक लावले तर आपली त्वचा कायमची सुंदर दिसते. आपल्या सर्वांना माहीती आहे की, टोमॅटो आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Use a face pack of tomato garlic and rose water to get a beautiful face)

जर आपल्या चेहऱ्यावर मुरूमाची समस्या असेल तर आपण टोमॅटोचा फेसपॅक घरी तयार करून आपल्या त्वचेवर लावू शकता. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला टोमॅटो, लसूण आणि गुलाब पाणी लागणार आहे. सर्वात अगोदर टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यामध्ये लसूणाची बारीक केलेली पेस्ट आणि गुलाब पाणी मिक्स करा.

ही पेस्ट फक्त चेहऱ्यावरील मुरूमाला लावा आणि साधारण तीस मिनिटांनंतर ही पेस्ट धुवा. हा उपाय आपण सतत आठवडाभर केला तर आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. आपण एक्सफोलिएशनसाठी ओटचे जाडे भरडे पीठ वापरू शकता. यासाठी आपल्याला 2 चमचे ओटच्या जाड भरड्या पिठामध्ये टोमॅटोचा पेस्ट 2 चमचे मिसळावी. यानंतर त्यात दही घालावे. हे लॅक्टिक अॅसिड, टॉक्झिन्स आणि छिद्र साफ करण्यास मदत करते.

हे आपल्या चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटो पॅक तुमच्यासाठी उत्तम. यासाठी, आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे काकडीची पेस्ट, एक चमचे मध मिसळावे लागेल. ही पेस्ट 15-20 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. यासाठी आपण अर्धा टोमॅटोच्या रसमध्ये 1 चमचा ऑलिव्ह तेल घाला. हे पॅक 15-20 मिनिटांनी आपल्या चेहऱ्यावर ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Use a face pack of tomato garlic and rose water to get a beautiful face)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.