त्वचेवर चमक येण्यासाठी अशाप्रकारे करा कोरफड जेलचा वापर, मिळतील आश्चर्यकारक फायदे

त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोरफडीचा बऱ्याच वेळा वापर केला जातो. कोरफड ही आरोग्यासोबतच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

त्वचेवर चमक येण्यासाठी अशाप्रकारे करा कोरफड जेलचा वापर, मिळतील आश्चर्यकारक फायदे
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 7:15 AM

हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत तीव्र डोकेदुखी पासून ते निर्जलीकरण कोरडी त्वचा आणि पोटाच्या समस्या होऊ लागतात. मात्र आपण या समस्यांसाठी अनेक घरगुती उपाय देखील वापरू शकतो.

थंडीच्या काळात आपल्या त्वचेत अनेक बदल होतात. थंडीमध्ये त्वचेचा कोरडेपणा वाढतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्वचेला मॉइश्चराइज करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. चमकदार त्वचा ठेवण्यासाठी आपण योग्य त्वचेची काळजी घेण्यासोबत आहाराची देखील काळजी घेतली पाहिजे.

थंड हवामानात त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी कोरफडीचे जेल लावता येते. अँटीऑक्सिडंट सोबतच यात अँटीइम्प्लिमेंटरी आणि एंटी फंगल गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे याच्या वापरामुळे त्वचेचे संबंधित समस्यांचा धोकाही कमी होतो.

बदाम तेल आणि कोरफड कोरफड आणि बदामाच्या तेलाचे मिश्रण लावल्याने काळे डाग कमी होतात. बदामाच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई असते. जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते. थोड्याशा एलोवेरा जेलमध्ये बदामाचे तेल मिसळा आणि झोपण्यापूर्वी लावा याचा खूप फायदा होतो.

खोबरेल तेल आणि कोरफड कोरफड आणि खोबरेल तेल देखील चमकदार त्वचेसाठी चांगले आहे. खोबरेल तेलात अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई सोबत अनेक खनिजे असतात. हे लावल्याने त्वचा कोरडी होणार नाही तुम्ही हे मानेवर आणि हाता पायांवर देखील लावू शकतात.

कोरफड आणि हळद एलोवेरा जेल मध्ये हळद मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकतात. हळदीमध्ये दाहाविरोधी आणि बुरशी विरोधी गुणधर्म असतात. हे मिश्रण लावल्याने त्वचा चमकदार तर होतेच पण यासोबत इन्फेक्शन पासूनही सुटका मिळते. अंघोळीपूर्वी तुम्ही एलोवेरा जेलमध्ये चिमूटभर हळद मिसळून लावू शकता. हे मिश्रण किमान दहा मिनिटे लावून ठेवल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतात.

मात्र एलोवेरा जेलचा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी त्वचेची पॅच टेस्ट करून घ्या. हे मिश्रण त्वचेसाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला त्यावरून कळेल.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.