बेसन पीठ केसांना लावा आणि मिळवा चमकदार आणि सुंदर केस !
बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मुंबई : बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु फारच थोड्या लोकांना माहिती आहे की, ज्याप्रमाणे त्वचेला बेसन पीठ लावणे चांगेल आहे त्यापेक्षाही अधिक केसांना बेसन पीठ लावणे फायदेशीर आहे. बेसन पीठाचा हेअर मास्क 2 ते 3 वेळा लावल्यास तुम्हाला केसांमध्ये बराच फरक जाणवेल. बेसन पीठाचा हेअर मास्क लावल्याने केस गळती कमी होते आणि आपले केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात. (Besan flour is beneficial for hair)
दोन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, दोन चमचे कोरफड जेल, एक चमचे मोहरीचे तेल, एक ते दीड कप पाणी हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा. यानंतर पाण्याने शॅम्पू लावून केस धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची तुमची दूर होईल. आठवड्यातून किमान दोनवेळा आपण नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील, तर आपण दररोज आपले केस धुतले पाहिजेत.
तिळाचे तेल हलके गरम करून, मग या तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा. काही वेळ हे तेल केसांमध्ये असंच राहू द्या आणि मग सध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल. तिळाचे तेल केसांना फक्त चमकच नाहीतर त्यांना मजबूतीही देते. जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर तिळाच्या तेलाचा वापर नक्की करून पाहा. याने केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील दूर होते.
बदामाच्या तेलात विटमिन ए, विटमिन बी 7, विटमिन ई, एसपीएफ 5, बायोटिन, अँटीबॅक्टेरियल घटक आढळतात. यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी बदामाचे तेल आपल्या त्वचेला लावले पाहिजे. सेन्सिटिव्ह केसांसाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय गुणकारी ठरते. हे तेलाबरोबरच केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून देखील काम करते.ऑलिव्ह ऑईलमुळे केस मजबूत होतात आणि केस फाटे फुटण्याच्या समस्येपासून मुक्त होतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care | थंडीमुळे कोरड्या पडलेल्या चेहऱ्याला मॉश्चराइझ करायचंय? वापरा घरगुती ‘स्ट्रॉबेरी फेस पॅक’!#strawberry | #skincare | #skincareroutine | #skincaretips https://t.co/K0gUjPPFHn
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 12, 2021
(Besan flour is beneficial for hair)