हनीमूनचा प्लॅन करताय? जोडीदारासोबत ‘या’ ठिकाणी घालवा अनमोल क्षण
मंद चंद्राचा प्रकाश, चांदणी रात आणि गोडवा असलेल्या स्रीसोबतचा सुंदर क्षण म्हणजे मधुचंद्र. पण, आताच्या नव जोडप्यांना मधुचंद्र नव्हे तर हनीमून पटकन कळतं. हिवाळा असल्याने तुम्ही हनीमूनचा प्लॅन करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. आम्ही भारतातील अशी काही खास ठिकाणे सांगणार आहोत, ज्याठिकाणी तुम्हाला गार हवेत जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवता येईल.
लग्नानंतर मधुचंद्रासाठी म्हणजेच हनीमूनसाठी जाण्याची प्रथा नवीन नाही. लग्ना इतकंच मधुचंद्र महत्त्वाचा असतो. नव्या जोडप्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी मधुचंद्रासाठी कुठेतरी पाठवलं जातं. परंतु लग्नानंतर चांगल्या ठिकाणी मधुचंद्रासाठी जाणे आणि सुंदर क्षण घालवणे, यासाठी तुम्हाला ठिकाणांची माहिती असायला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला भारतातील असेच काही खास ठिकाणे सांगणार आहोत. जाणून घ्या.
लग्नानंतर लोकांना अशा ठिकाणी जायला आवडतं जिथे त्यांना एकमेकांसोबत सुंदर ठिकाणी क्षण घालवण्याची संधी मिळते. जर तुम्हीही लग्न करणार असाल आणि थंडीच्या ऋतूत हनीमूनला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत फिरण्यासाठी या ठिकाणी जाऊ शकता.
उत्तराखंड
हिवाळ्यात बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर उत्तराखंडमधील अनेक ठिकाणांना भेट द्यायला जाऊ शकता. तुम्ही औली, डेहराडून, जिम कॉर्बेट, कौसानी, मसूरी, नैनीताल, राणीखेत, बिनसार, अल्मोडा, लॅन्सडौन आणि धनोल्टी ला भेट देण्याचा प्लॅन आखू शकता. या ठिकाणी तुम्हाला एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करण्याची संधी मिळेल, याशिवाय काही ठिकाणी टॉबोगिंगसारखे अनेक अॅक्टिव्हिटी करण्याची संधी मिळू शकते. बर्फाच्छादित डोंगरांचे दृश्य अतिशय सुंदर असेल.
हिमालय
तुम्ही हनीमूनसाठी हिमाचलला देखील जाऊ शकता. यावेळी येथे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी पाहायला मिळते. शिमला, चायल, मनाली, डलहौसी, कसौली, कुल्लू, चंबा, मंडी, किन्नौर, सोलंग व्हॅली, नारकंडा, चिंडी-करसोग व्हॅली, तीर्थन व्हॅली, स्पीती व्हॅली आणि धरमशाला ही इथली अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे तुम्हाला हिवाळ्यात बर्फवृष्टी आणि हिमक्रिया करण्याची संधी मिळू शकते.
दक्षिण भारत
हनीमूनसाठी तुम्ही दक्षिण भारतातही जाऊ शकता. इथं फारशी थंडी नसली तरी या वेळी इथलं नैसर्गिक दृश्य खूप चांगलं असतं. दक्षिण भारतातील काही हिल स्टेशन्स आणि समुद्रकिनारे फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. कोवलम, वरकला, बेकल, अलेप्पी, कुमारकोम, पुद्दुचेरी, वायनाड, मुन्नार, कोडईकनाल, उटी, कुर्ग, देवीकुलम, येरकौड, अनंतगिरी हिल्स, कोटागिरी, कुद्रेमुख, नंदी हिल्स, वालपराई, वागमोन, केम्मनगुंडी, हंपी, म्हैसूर, पूवर, सकलेशपूर, कारवार, अगुंबे आणि मुल्लायनगिरी ही काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
आम्ही तुम्हाला हनीमूनसाठी वरील खाली खास ठिकाणे सांगितली आहे. आता याठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवू शकतात. तसेच भारतातील ही अशी काही खास ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी नवीन जोडपे खास म्हणजे हिवाळ्यात हनीमूनसाठी जातात. तुम्ही देखील या ठिकाणी हनीमूनसाठी प्लॅन करू शकतात.