प्रियांका चोप्राच्या तजेल त्वचेचं रहस्य, म्हणते, टेन्शन नाही, घरच्या घरी अशी घ्या काळजी!
2000 साली मिस वर्ल्डचा किताबही पटकावणारी भारताची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा. बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत तिने तिच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. पण ती तीच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.प्रियांका चोप्रा निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी केवळ तिच्या आई आणि आजीच्या घरगुती उपचारांवर अवलंबून आहे .
मुंबई : 2000 साली मिस वर्ल्डचा किताबही पटकावणारी भारताची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा. बॉलिवूड ते हॉलीवूडपर्यंत तिने तिच्या क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली आहे. पण ती तीच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.प्रियांका चोप्रा निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी केवळ तिच्या आई आणि आजीच्या घरगुती उपचारांवर अवलंबून आहे. याचा उल्लेख तिने स्वतः एका व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केला आहे. प्रियांका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. चला तर मग जाणून घेऊयात तिचे ब्यूटी सिक्रेट.
घरगुती लिप स्क्रब:
प्रियंका चोप्रा ओठ गुलाबी आणि मुलायम करण्यासाठी होममेड लिप स्क्रब वापरते. ते तयार करण्यासाठी, ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मीठात मिसळा आणि स्क्रब तयार करा. यानंतर, हा स्क्रब ओठांवर घासून घ्या. यासह, ओठांच्या मृत त्वचेच्या पेशी काढून टाकल्या जातील आणि ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग परत येईल.
होममेड बॉडी स्क्रब: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किन
प्रियंकाने व्हिडिओमध्ये निर्दोष आणि चमकदार त्वचेसाठी होममेड बॉडी स्क्रबबद्दल सांगितले. यामुळे त्वचा हायड्रेट होते आणि छिद्र आतून स्वच्छ होतात. हे होममेड बॉडी स्क्रब बनवण्यासाठी, एक कप बेसनमध्ये थोडे दही आणि लिंबाचा रस मिसळा. नंतर त्यात थोडे दूध, चंदन पावडर आणि सुमारे एक चिमूटभर हळद घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि शरीरावर गोलाकार मालिश करुन घासून लावा. जेव्हा हे स्क्रब पूर्णपणे सुकेल तेव्हा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
इतर बातम्या :
Katrina Kaif : ‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी कतरिना कैफचा ग्लॅमरस अवतार, पाहा खास फोटो
‘होम मिनिस्टर’ची मानाची पैठणी देऊन आदेश बांदेकर भावोजींनी केला कतरीनाचा सन्मान! पाहा फोटो…