Milk Benifits : म्हशीचे की गाईचे, कोणते दूध असते अधिक पौष्टिक

Cow Milk vs Buffalo Milk : आपल्या आरोग्यासाठी दूध हे खूप फायद्याचे मानले जाते. दुधात अनेक महत्त्वाचे गुणधर्म असतात. पण अनेकांच्या मनात संभ्रम असतो की, कोणते दुध हे अधिक पौष्टीक असते. गाईचे दूध की म्हशीचे दूध कोणते दूध आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दोघांमध्ये नेमका फरक काय आहे.

Milk Benifits : म्हशीचे की गाईचे, कोणते दूध असते अधिक पौष्टिक
milk
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 5:15 PM

Milk Benifits : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. दुधात अनेक पौष्टिक गुण असतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज रोज एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दुधात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात. पण गाय आणि म्हशीच्या दुधाबद्दल लोकांमध्ये नेहमीच संभ्रम असतो की कोणते दूध अधिक पौष्टिक असते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की दोनपैकी कोणते दूध जास्त फायदेशीर आहे.

गाय आणि म्हशीच्या दुधात फरक काय

गाईच्या दुधात चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळेच ते पचायला सोपे देखील असते. या उलट म्हशीचे दूध मलईदार आणि घट्ट असते, त्यामुळे ते पचायला थोडे कठीण असते.

गाईच्या दुधात पाण्याचे प्रमाण जास्त असते. तर म्हशीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, तर गाईच्या दुधात जीवनसत्त्वे जास्त असतात. या दुधाचा रंग हलका पिवळा आणि पांढरा असतो.

म्हशीचे दूध मलईदार पांढरे असते, गाईच्या दुधापेक्षा थोडेसे कमी पिवळे असते.

दूध पिण्याचे फायदे

दूध एक परिपूर्ण आहार मानला जातो. प्रौढ असो की मुले कोणीही दुधाचे सेवन करु शकतात. दुधात अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील भरपूर असतात. दुधात प्रोटीन आणि कॅल्शियमसारखे अनेक पोषक घटक आढळतात. दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दुध दात आणि हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

आरोग्यासाठी कोणते दूध चांगले?

गाय आणि म्हशीचे दूध दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे तुम्हाला कोणते दूध प्यायचे आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर तुमच्यासाठी गाईचे दुध चांगले. पण जर तुमची पचनक्रिया चांगली असेल तर तुम्ही म्हशीचे दुध पिऊ शकता.

जर तुम्हाला रात्री शांत झोप घ्यायची असेल तर तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास म्हशीचे दूध पिऊ शकता. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.