AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips | घरच्या घरीच तयार करा गुलाब पाणी, काहीच दिवसांत दिसेल चेहऱ्यावर फरक

अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते.

Beauty Tips | घरच्या घरीच तयार करा गुलाब पाणी, काहीच दिवसांत दिसेल चेहऱ्यावर फरक
गुलाब पाणी
| Updated on: Mar 24, 2021 | 10:45 AM
Share

मुंबई : अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध, गुलाब पाणी केवळ चेहर्‍याची चमकच वाढवत नाही, तर चेहर्‍याला पोषण देखील देते. तसेच, चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते. गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्हर म्हणून देखील काम करते. ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते. गुलाब पाण्याचे हे सर्व फायदे जाणून असल्याने आपण ते बाजारातून विकत घेतो. (By following these tips Make rose water at home)

बाजारातील गुलाब पाण्याच्या शुद्धतेची हमी देता येत नाही. अशावेळी जर, तुम्हाला शुद्ध गुलाब पाणी हवे असेल, तर आपण ते घरी सहज तयार करू शकता. गुलाबपाण्याने त्वचा नियमित स्वच्छ केल्यामुळे त्वचेच्या आतील धुळ माती निघून जाते. मात्र त्यासोबतच तुमच्या त्वचेतील ओलावादेखील कायम राहतो. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्याने तुमच्या त्वचेला एक प्रकारचा तजेदारपणा येतो.

यासाठीच उन्हाळ्यात त्वचा फ्रेश दिसावी असं वाटत असेल तर घराबाहेर पडताना एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाबपाणी भरा आणि सोबत ठेवा. थकवा जाणवू लागल्यास चेहऱ्यावर शिंपडण्यासाठी हे पाणी तुम्ही वापरू शकता. ज्यामुळे तुम्ही लगेच फ्रेश दिसू शकाल. आपल्याला घरच्या घरी बनवलेले गुलाबाचे पाणी स्किन टोनर म्हणून वापरायचे असेल, तर 100 मिली स्प्रे असलेल्या बाटलीत 85 मिली गुलाब पाणी घ्या.

त्यात 8 ते 10 थेंब लव्हेंडर तेल आणि ग्लिसरीन घाला. वापरापूर्वी नेहमी बाटली व्यवस्थित घुसळा. यामुळे सगळे घटक व्यवस्थित मिक्स होतील. जर, आपल्याला मेकअप रिमूव्हर म्हणून गुलाबाचे पाणी वापरायचे असेल, तर दोन चमचे गुलाबपाण्यात एक चमचा नारळाचे तेल टाका. हे मिश्रण एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(By following these tips Make rose water at home)

कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.