लव्ह मॅरेज असून सुद्धा नात्यात गोडवा टिकत नसेल तर प्रत्येक पार्टनरने जाणून घ्यायला हव्यात काही टिप्स, तुटलेले नाते पुन्हा जुळेल!!
लव मॅरेज लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुद्धा अनेकदा भांडण ,कटकटी,यासारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. नात्यामधील गोडवा निर्माण होण्यासाठी एकमेकाला समजून घेणे, एकमेकांचे ऐकणे यासारख्या काही टिप्स फॉलो करायलाच हव्यात.
अनेकदा असे पाहायला मिळते की, लव मॅरेज( Love marriages ideas ) असून सुद्धा नातेसंबंधांमध्ये खूप सार्या समस्या निर्माण होतात. अनेकदा पती-पत्नी यांच्यात वारंवार भांडणे सुरू ( Relationship problems ) असतात, यामागील कारणे देखील वेगवेगळी असू शकतात. बहुतेक वेळा काळानुसार अनेक गोष्टी बदलत असतात परंतु जर तुमच्यातील भांडणे वाद जास्तच वाढले असतील तर अशा वेळी या परिस्थितीला नियंत्रणात आणणे अनेकदा कठीण होऊन बसते. अशावेळी दिवसेंदिवस नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. तर नाते संपून जाण्यापेक्षा या नात्यांमध्ये कशाप्रकारे गोडवा निर्माण होईल यासाठी काही प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याला नात्यामध्ये सुधारणा व बदल करणे देखील गरजेचे आहे. जेव्हा आपले नाते नवीन असते तेव्हा आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीच आपण आपल्या पार्टनर समोर मांडत असतो. परंतु काळानुसार अनेक अशा काही गोष्टी समोर येऊ लागतात त्यामुळे पती-पत्नी यांच्या नात्यांमध्ये तेढ निर्माण होऊ लागतो. ज्या जोडप्यांचे लग्न लव मॅरेज पद्धतीने झालेले असते, या मंडळी सुद्धा अनेकदा भांडण यांना सामोरे जावे लागते. भांडण होण्यामागील कारणे देखील बहुतेक वेळा वेगवेगळे असतात. अनेकदा शूल्लक कारणे सुद्धा तुमच्यामध्ये वाद निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. नात्यांमध्ये गोडवा निर्माण करायचा असेल, भांडण संपवायचे असतील तर अशावेळी दोघांपैकी एकाने समजूतदार पणाने वागणे गरजेचे आहे, परंतु अशावेळी आपल्याला काय करावे हे माहिती नसते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलेलो आहोत. ज्या टिप्स ( relationship tips ) तुम्ही पाळल्या तर तुमच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक चांगले होईल. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल…
एकमेकांना समजून घेणे
लग्नानंतर एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर अनेकदा खूप लोक एक चूक करतात. ती चूक म्हणजे एकमेकांना समजून न घेणे. असे अनेकदा म्हटले जाते की, जर जोडप्यांमध्ये समजून घेण्याची क्षमता जास्त असेल तर त्यांच्या नात्यांमध्ये कधीच कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही. परंतु हल्ली परिस्थिती बदललेली आहे. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करत असताना दुसऱ्यांचे म्हणणे अजिबात ऐकत नाही. कुठेतरी पती-पत्नीच्या नात्यामध्ये अंडरस्टॅंडिंग क्षमता कमी पडते, अशावेळी पती-पत्नीमध्ये भांडणे वाद होतात. जेव्हा कधी भांडणाची परिस्थिती निर्माण होईल असे तुम्हाला वाटत असेल तर आधी तुमच्या जोडीदाराचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या. त्यावर विचार करा. आणि मगच कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्या. अर्धवट ऐकून कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अन्यथा तुमच्यामध्ये भांडण होऊ शकते.
अबोला धरू नये
अनेकदा असे होते की, आपल्या पार्टनर सोबत भांडण झाल्यावर आपण एकमेकांशी बोलणे बंद करून देतो. ही एक सर्वसामान्य चूक आहे परंतु ही चूक जर आपण वेळेवर सुधारली नाही तर त्या चुकीचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागू शकतील. अशा परिस्थितीत तुमच्या मनामध्ये जोडीदार बद्दल अनेक गैरसमजुती निर्माण होतील. याच काही गैरसमजुती भविष्यात तुमच्या नात्याला वेगळेच वळण येऊ शकते. जर तुमच्या मध्ये भांडण झाल्यास चुकूनही अबोला धरू नये.योग्य वेळीच समस्येचे निराकरण करून त्यातून मार्ग काढायला हवा.
अडवू नका
अनेकजण नात्यांमध्ये पार्टनरला प्रत्येक वेळी कोणतेही कार्य करत असताना अडवत असतात. त्या कामामध्ये चुका काढत असतात,अशा वेळी तुमचा पार्टनर तुमच्यावर रागावू शकतो. तुमच्यावरच चिडू शकतो. एवढेच नाही तर तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये तुमच्या विषयी नकारात्मक भावना सुद्धा निर्माण होऊ शकते. असे वारंवार घडत असेल तर भविष्यात तुमच्या पार्टनरला ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्याबद्दल तुम्हाला तो सांगणार नाही. अशा प्रकारच्या वागण्यामुळे तुम्हा दोघांच्या नात्यांमध्ये अंतर निर्माण होईल आणि कुठेतरी विश्वास सुद्धा कमी होईल म्हणूनच तुमच्या जोडीदाराला एखादे कार्य करावे असे वाटत असेल तर त्याला अजिबात अडवू नका. उलट त्याला ते कार्य कशा पद्धतीने चांगले होऊ शकते याबद्दल सकारात्मक गोष्टी सांगून योग्य मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करा.
टिप्स : वरील माहिती सर्वसाधारण पणे सांगण्यात आलेली आहे. टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नाही. जर तुमच्या नात्यांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर अशा वेळी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
इतर बातम्या
कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे निंयत्रणात, मास्कमुक्तीचा निर्णय नाहीच : राजेश टोपे