लॉकडाऊनमध्ये वाढलेले वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार करा, होतील अनेक फायदे!
वाढलेले वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते.
मुंबई : वाढलेले वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत आणि जे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतात ते खाण्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. सध्या काही राज्यांमध्ये लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यायाम करण्यासाठी आपण बाहेर देखील जाऊ शकत नाहीत. परंतू वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आपण घरचे घरी सूर्य नमस्कार करू शकतो. (Doing Surya namaskar is beneficial for health)
सूर्याकडे तोंड करून नियमित सूर्य नमस्कार करा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मुलांनीही नियमित सूर्यनमस्कार करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत होते. सूर्य नमस्कार केल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे मणक्याचे हाड मजबूत राहते. व्यायामादरम्यान ताणल्याने स्नायूही निरोगी राहतात. सूर्यनमस्कारामुळे वजन देखील कमी करता येते. हा व्यायाम नियमित केल्याने पोटावरची चरबी कमी होते.
सूर्यनमस्कार दरम्यान वायु श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित पोहचतो. यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यात मदत होते. सूर्य नमस्कार मज्जासंस्था शांत ठेवतात. यामुळे मेंदूची एकाग्रता वाढते. यामुळे ताण कमी होतो.सध्याच्या कोरोना काळात तर तणावापासून दूर राहण्यासाठी सूर्य नमस्कार करणे खूप आवश्यक आहे. शिवाय सुर्य नमस्कार करण्यासाठी जागाही कमी लागते.
सूर्य नमस्काराचे फायदे : सूर्यनमस्कारांना ‘फूल बॉडी वर्कआऊट’ म्हटले जाते. यात एकूण 12 आसने आहेत. नियमित सूर्य नमस्कार केल्याने शरीरात लवचिकता येते. तसेच, शरीरात रक्त परिसंचरण आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो. हृदयरोगाचा धोका कमी होतो, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, रोगप्रतिकारक शक्ती आणि मज्जासंस्था यांचे कार्य सुरळीत होते. सूर्यनमस्कारामुळे मधुमेह, संधिवात आणि तणाव यासारख्या आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.
हे लक्षात ठेवा सूर्यनमस्कार सकाळच्या वेळेत रिकाम्या पोटी करावा. सुरुवातीला 10 ते 12 वेळा सूर्यनमस्कार घालावेत, त्यानंतर हळूहळू ही संख्या वाढवू शकता. हे आसन मऊ गादी किंवा पलंगावर करु नका. यामुळे आपल्या पाठीच्या कण्याला हानी पोहचू शकते. गर्भवती महिला, स्लिप डिस्कचे रुग्ण आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी सूर्यनमस्कार करू नये.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Doing Surya namaskar is beneficial for health)