मुंबई : सध्या देशामध्ये कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्याही वाढतच आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मृत्यू होण्याऱ्याची संख्या देखील वाढली आहे. तसेच जे कोरोनावर मात करतात त्यांना अशक्तपणा बरेच दिवस जाणवतो. कोरोनावर मात केल्यानंतर अशक्तपणा येतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. हा अशक्तपणा दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होईल. (Drink this drink to relieve weakness and increase appetite after corona)
तयार करण्याची पध्दत
कोरोनातून बरे झाल्यानंतर दुधी भोपळा, गाजर, बीट यासारख्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून शरीराला ताकद मिळेल. परंतु तोंडाची चव इतकी वाईट होते की, हे सर्व खाणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण याचा रस मात्र, पिऊ शकतो. हा रस पिल्याने आपली कमजोरी दूर होईल, हिमोग्लोबिन वाढेल आणि रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल.
रस तयार करण्यासाठी, गाजर, दुधी भोपळा, बीटरुट, टोमॅटो, डाळिंब, मोसंबी किंवा संत्री, आल्याचा तुकडा आणि सफरचंद घालून रस तयार करा. या रसात लिंबू घाला, काळे मिठ आणि मिरपूड घाला. यानंतर, हे सर्व मिक्सरमध्ये काढून घ्या आणि प्या. कमीतकमी 10 दिवस असे करा. या रसमुळे आपल्याला आवश्यक खनिजे देखील मिळतील आणि आपल्या शरीराची कमजोरी देखील दूर होईल. घरातील बाकीचे सदस्यही हा रस पिऊ शकतात. हा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
या गोष्टींचा देखील फायदा होईल
दररोज रात्री 5 मनुक, 5 बदाम, 5 अक्रोड आणि दोन अंजीर भिजवा. सकाळी उठून रिकाम्या पोटी खा. हे खाल्ल्यानंतर अर्धा तास अजून काही खाऊ नका. असे केल्याने, शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल.
संबंधित बातम्या :
Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Immunity booster tips | तुळस, सुंठ, दालचिनी, रोगप्रतिकार शक्तीसाठी राज्य सरकारच्या टिप्सhttps://t.co/tw56yxMJJr#ImmunityBooster #ImmunityTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 11, 2020
(Drink this drink to relieve weakness and increase appetite after corona)