घरच्या घरी टोमॅटोचा रस बनवा; आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या !
टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकले जातात.
मुंबई : टोमॅटो खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. आपल्या रोजच्या आहारात टोमॅटो जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये टाकले जातात. भाजी किंवा आमटी शिवाय कोशिंबीरी, सॉस आणि सूप म्हणून देखील टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, सध्याच्या कोरोना काळात टोमॅटोचा रस पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Drinking tomato juice is beneficial for health)
आज आम्ही तुम्हाला टोमॅटो रस घरच्या घरी कसा तयार करायचा हे सांगणार आहोत. हा रस पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासाठी एक ग्लास पाणी, मीठ, आद्रक आणि दोन टोमॅटो लागणार आहेत. सर्वात अगोदर पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा आणि त्यात मीठ आणि आद्रक मिसळा. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट बारीक करून घ्या आणि या गरम पाण्यात मिसळा. हे मिश्रण साधारण वीस ते तीस मिनिटे मंद गॅसवर ठेवा आणि गरमा गरम प्या. हा टोमॅटोचा रस आपण दररोज आहारात घेतला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल.
याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. टोमॅटोमध्ये कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. यामुळे दररोज टोमॅटो खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करायचे असेल तर टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे. आपण एक टोमॅटो खाल्ले तर बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते.
टोमॅटो खाण्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. कारण टोमॅटोमध्ये जवळापास 94 टक्के पाणी असते. यामुळे विशेष: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टोमॅटो जास्तीत-जास्त खाल्ले पाहिजे. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशा व्यक्तींनी तर दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी एक टोमॅटो तरी खाल्ले पाहिजे. यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.
(टीप : कोणत्याही प्रकारच्या सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Kidney Stone | मुतखड्याच्या समस्येने त्रस्त आहात? मग, चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drinking tomato juice is beneficial for health)