‘वेटलॉस’ करण्यासाठी ‘या’ वेळेवर करा जेवण! चमत्कारिक रित्या कमी होईल तुमचे वजन
जे लोक वजन कमी करण्यासाठी खाणे-पिणे बंद करतात, त्यांनी नवीन संशोधन जाणून घेतले पाहिजे. ब्रिटिश जर्नल ऑफ हेल्थ सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जर एखाद्या व्यक्तीने भूक लागल्यावरच अन्न खाल्ले तर त्याचे वजन कमी होण्यास मदत होते, तसेच त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
वजन कमी करण्यासाठी लोक पहिली गोष्ट करतात ती म्हणजे ‘अन्न त्याग’ (food sacrifice) वजन कमी करण्यासाठी, लोक सर्व काही खाणे बंद करतात आणि सलाद किंवा हलके अन्न खाण्यास सुरवात करतात. असे असताना ते चुकीचे आहे. विज्ञान सांगते की, वजन कमी करण्यासाठी अन्न सोडण्याची गरज नाही, तर संतुलित आहार (A balanced diet) आवश्यक आहे. संतुलित आहार म्हणजे कर्बोदके, फॅट(चरबी), प्रथिने आणि फायबर योग्य प्रमाणात आहे असा आहार. यासोबतच तुम्ही जो आहार घेत आहात तो पोषक तत्त्वांनी युक्त असावा. नुकतेच एक संशोधन करण्यात आले आहे ज्यामध्ये सांगितले आहे की, कोणत्या वेळी अन्न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर, ब्रिटिश जर्नल ऑफ हेल्थ सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेले नवीन संशोधन (New research) जरूर वाचा.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही कधी खावे?
डेली मेलच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा एखाद्याला भूक लागते तेव्हा अन्न खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. संशोधनानुसार जे लोक भूक लागल्यावरच अन्न खातात त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता जास्त असते. जे खूप कमी खातात त्यांच्यापेक्षा त्यांना चांगले वाटते.
या संशोधनात आठ देशांतील 6,000 हून अधिक प्रौढांचा समावेश करण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. त्यांना काही प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) देखील तपासण्यात आला. संशोधनात सहभागी लोकांची खाण्याची शैली तीन प्रकारे मोजली गेली. भूक लागल्यावर खाणे, भावनिकरित्या खाणे आणि खूप कमी खाणे.
जर एखाद्याला तणाव किंवा दुःख वाटत असेल तर तो भावनिक आहार घेतो. दुसरीकडे, जर कोणी कॅलरीज मोजून खातो, तर तो कडक पालन करून(स्ट्रिक्ट इटिंग) खातो. विश्लेषणात असे दिसून आले की जे लोक फक्त भूक लागल्यावर खातात, अशा लोकांचे वजन लवकर कमी होते आणि त्याच वेळी त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगले असते.
उपासमार प्रभावी नाहीच
न्यू जर्सी येथील रटगर्स युनिव्हर्सिटीच्या प्रमुख संशोधक डॉ. शार्लोट मार्क यांच्या मते, बरेच लोक सल्ला देतात की जर तुम्हाला भूक लागत असेल पण, वजन कमी करायचे असेल तर तुम्ही खाऊ नका. पण तसे नाही. भूक लागल्यावरच अन्न खाल्ले तर शरीराला बरं वाटेल आणि वजन कमी होण्यासही मदत होईल. हे संशोधन म्हणजे वजन कमी करण्यासाठी आणि शरीर समाधानासाठी डाएटिंग प्रभावी आहेच, पण त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो याचा पुरावा आहे. नवीन ट्रेंड वगळता प्रत्येकाने भूक लागल्यावरच खावे, यामुळे वजन कमी होण्यास अधिक मदत होईल.
ब्रिटिश जर्नल ऑफ हेल्थ सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जर एखाद्याने भूक लागल्यावर अन्न खाल्ले नाही तर त्याचा राग आणि चिडचिड वाढू शकते. शारीरिक कमतरते सोबतच मानसिक आरोग्यही त्यातून खालावू शकते.