रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटामिन सी आणि प्रोटीनयुक्त अन्न खा, वाचा !

कोरोनापासून दूर राहण्यासाठी तंदुरुस्त आणि निरोगी राहणे महत्वाचे आहे. सध्याच्या वाढलेल्या कोरोना परिस्थितीमध्ये तर हेल्दी डाएट घेणे महत्वाचे झाले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटामिन सी आणि प्रोटीनयुक्त अन्न खा, वाचा !
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:09 AM

मुंबई : कोरोनापासून दूर राहण्यासाठी तंदुरुस्त आणि निरोगी राहणे महत्वाचे आहे. सध्याच्या वाढलेल्या कोरोना परिस्थितीमध्ये तर हेल्दी डाएट घेतला पाहिजे. कारण हेल्दी डाएटमुळे आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो. प्रत्येक दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात व्हिटामिन सी आणि प्रोटीनयुक्त अन्न घेतले पाहिजे. (Eat foods rich in vitamin C and protein to boost the immune system)

व्हिटामिन सी टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात आढळते. टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात.

प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे चांगले मानले जाते. जर आपल्याला हाडांशी संबंधित आजारांना दूर ठेऊन म्हातारपणातही ताठ राहायचे असेल, तर आपल्या आहारात निश्चितपणे कॅल्शियमयुक्त पदार्थ समाविष्ट करा.

लाल शिमला मिर्चीत जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. कॅप्सिकममध्ये कॅलरी असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त लाल शिमला मिर्चीचा समावेश करा. शिमला मिर्ची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.

इडली ही दक्षिण भारतातला आवडता पदार्थ आहे. आपल्या दिवसाच्या निरोगी सुरुवात करण्यासाठी तांदूळ किंवा रव्याऐवजी ओट्स वापरुन गरमागरम इडली बनवू शकता. ओट्समध्ये प्रथिने तसेच फायबर भरपूर प्रमाणात असते. न्याहारीत प्रथिने, कार्बोदके व साखर यांचे प्रमाण संतुलित असावे. फळे, भाज्या यांचा आहारात शक्यतो समावेश करावा. आहारात नैसर्गिक भाजीपाला, फळे, धान्य यांचा वापर करावा. सकाळी एक चमचा गायीचे तूप व एक कप गायीचे दूध घेणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eat foods rich in vitamin C and protein to boost the immune system)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....