अळूची पाने खाण्याचे फायदे आणि तोटे वाचा !

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. दिवसेंदिवस मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

अळूची पाने खाण्याचे फायदे आणि तोटे वाचा !
अळूची पाने
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 9:58 AM

मुंबई : मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. दिवसेंदिवस मधुमेहाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मधुमेहाकडे दुर्लक्ष करणे देखील चुकीचे आहे. मधुमेह रूग्णांनी आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश करावा लागणार आहे. जेणेकरून आपल्या साखरेची पातळी नियंत्रित राहिल यासाठी आहारात अळूची पाने जास्तीत-जास्त खावी लागतील. अळूच्या पानामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रण राहते. (Eating Taro leaves is beneficial for diabetics)

अळूच्या पानातील पौष्टिक घटक अळूची पाने कधीही कच्ची खाऊ नयेत. अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्सलेट असते. जर कच्ची अळूची पाने खाल्ली तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून, ते शिजवून खाणे, अळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात.

मधुमेह कमी करण्यासाठी फायदेशीर अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करते. हे शरीरात इन्सुलिन आणि ग्लूकोज सोडते. यामुळे ग्लायसेमिक पातळी देखील राखली जाऊ शकते. मधुमेह कमी होण्यास मदत होते. जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण आपल्या अळूच्या पानाचा समावेश करू शकता.

या समस्यांसाठी अळूचे पाने फायदेशीर -वजन कमी – अळूच्या पानामध्ये कॅलरी कमी असतात. जे वजन कमी करण्यास मदत करते.

-स्नायू बळकट होतात – अळूमध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते. हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते. अळूमध्ये उपस्थित मॅग्नेशियम आपले स्नायू आणि हाडे मजबूत करते.

-रोगप्रतिकारक शक्ती मजबूत अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामध्ये उपस्थित व्हिटॅमिन सी अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. हे कर्करोग आणि हृदयरोगाच्या वाढीस प्रतिबंध करते.

हेही लक्षात ठेवा -कच्च्ये अळूचे पाने खाल्ल्याने घशात जळजळ होऊ शकते.

-दमा असलेल्या लोकांनी अळूची पाने सेवन करू नयेत.

-ज्या लोकांना गुडघा दुखणे आणि खोकल्याची समस्या उद्भवते. त्यांनी देखील अळूची पाने खाणे टाळावे.

-ज्या लोकांना गॅसची समस्या आहे. अशांनी अळूची पाने खाणे टाळावे.

संबंधित बातम्या : 

(Eating Taro leaves is beneficial for diabetics)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.