Sharvari Wagh Photos : अभिनेत्री शर्वरी वाघचं समुद्रकिनारी नवं बिकिनी फोटोशूट, चाहते म्हणाले…
अभिनेत्री शर्वरी वाघ हिने नुकतेच आपल्या इस्टाग्राम अकाउंटवर बिकीनीवरील फोटो शेअर केले आहे. फोटो पाहताच शर्वरीच्या चाहत्यांकडून अगदी लाइक्स आणि कमेंटचा पाउसच पडला. अनेकांना तिचे हे फोटो आवडले आहे.
मुंबई : राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत बंटी और बबली 2 (Bunty Aur Babli 2) मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेल्या शर्वरी वाघ (Sharvari Wagh) हिने नुकतेच एका बीचवर फोटोशूट (Sharvari Wagh photoshoot) केले आहे. सोबतच मागे असलेला सनसेट, केशरी पिवळ्या रंगाच्या बिकीनीवर अस्ताला जात असलेल्या सूर्याची सोनेरी किरणे यामुळे शर्वरी अधिकच ‘ग्लॅमरस’दिसत आहे. तिने इस्टाग्रामवर आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. फोटो बघताच त्यावर लाइक्स व कमेंटचा पाऊस झाला. अनेकांना शर्वरीचा हा लूक पसंत आला असून तिच्या नव्या कट-आउट बिकीनी ड्रेसने चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. इस्टावर आपला फोटो शेअर करत शर्वरीने ‘आय डोन्ट माइन्ड आर बिकीनीस् ॲण्ड सनसेट’ असे लिहले आहे. शर्वरीच्या या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आपल्या या ‘हॉट’ अदांनी तिने आपल्या चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवल्याचेही म्हटले जात आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री शर्वरी वाघ ही बॉलीवूडमधील ‘फॅशनिस्ट’ स्टार म्हणून समोर येत आहे. तिचे इस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फॉलोवर्स आहेत. ती रोज आपल्या नवनव्या लूकमधील फोटो शेअर करत असते. शर्वरीने बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले असून तेव्हापासून ती आपल्या वेगवेगळ्या ड्रेसअपने चर्चेत असते. मोनोटोन सेपरेट्सपासून ते भरतकाम केलेल्या पारंपारिक कपड्यांपर्यंत अनेक प्रयोग करण्यासाठी ती प्रसिध्द आहे. तीने नुकत्याच एका बीचवर शूटसाठी सी-थ्रू कट-आउट ड्रेस परिधान केला होता. यात, ती खूपच ‘कम्फर्टेबल’ वाटत होती. शर्वरीने सूर्यास्ताच्या समुद्रकिनाऱ्यावरील फोटोशूटसाठी खास ‘ओम्ब्रे लुक’ निवडला होता.
शर्वरीचा ‘बीच लूक’
शर्वरीने ओम्ब्रे इफेक्ट तयार करण्यासाठी ड्युअल ब्लश गुलाबी आणि पिवळ्या टोनमध्ये पूर्णपणे कव्हर-अप झालेल्या मिडी ड्रेसची निवड केली होती. सी-थ्रू स्लीव्हलेस एन्सेम्बलमध्ये प्लंगिंग नेकलाइन, नेकलाइन आणि मिड्रिफवर फ्रंट टाईड नॉट्स, फ्रंट कट-आउट्स आणि फिगर-स्किमिंग अशा ड्रेसअपमुळे शर्वरी अधिकच सुंदर दिसत होती. सोबतच तिच्या दोन्ही हातात अंगठ्या आणि मोत्याचे पेंडेंट असलेली एक आकर्षक चेन होती त्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते. शर्वरीने लांबलचक कपडे स्टाईल केले होते. ग्लॅमरस फोटोंसाठी तिने ग्लॉसी न्यूड लिप शेड, ड्यू बेस मेक-अप निवडला होता.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
सेलिब्रिटी फोटोग्राफर साशा जयराम यांनी शर्वरीच्या फोटोवर ‘अनरिअल…कल्पनेच्या पलीकडे’ असं म्हटले आहे. काही चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. कुणी तिला सुंदर म्हटलंय तर कुणी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे.
संबंधित बातम्या